24 November 2024 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

देशासाठी आनंदाची बातमी; कोविड-१९'चे ८६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले

Corona Crisis, Corona Virus, Covid 19

मुंबई, २९ मार्च: राज्यातील ३५ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज रविवारी नवीन २२ रुग्णांची नोंद झाली असून, महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या २०३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून, पाच रुग्ण पुण्याचे आहेत. नागपूर तीन, अहमदनगर २ आणि सांगली, बुलडाणा व जळगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु, यादरम्यानही आता दिलासादायक बातम्या येत आहेत. कोविड-१९ मधून आतापर्यंत १० टक्के रुग्ण मुक्त झाले आहेत. रविवारी जारी करण्यात आकडेवारीनुसार कोविड-१९ चे ८६ रुग्ण या विषाणूतून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशभरातील सध्याच्या रुग्णांच्या संख्येनुसार ही आकडेवारी १० टक्के आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्यासंख्येने वाढत आहेत. दोन्ही राज्यातील आकडेवारी २०० च्या नजीक पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या २०३ झाली आहे. तिथे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर राज्यात ३४ रुग्ण पूर्णपणे बरेही झाले आहेत.

 

News English Summary: The number of corona virus patients in the country is increasing day by day. But, meanwhile, comforting news is now coming. So far, 10 percent of patients have been released from Covid-19. According to data released on Sunday, 86 patients with Covid-19 have been completely cured of the virus. According to the current number of patients in the country, this figure is 10 percent. According to the Ministry of Health, Corona virus patients are increasing in Maharashtra and Kerala. Statistics in both states have reached close to 200. Maharashtra has 203 coronary disease patients. Six people have died there. In addition, 34 patients were completely recovered in the state.

 

News English Title: story corona virus News in India 86 people in India beat Covid19 nearly 10 percent of all corona virus patients recover News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x