21 November 2024 10:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जगातील दीड लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे, तर ८०% जणांना रुग्णालयाची गरज पडली नाही

Corona Crisis, Covid 19

मुंबई, ३० मार्च: कोरोना विषाणूमुळे जगात दहशत निर्माण झाली आहे. हा विषाणू ज्या वेगाने पसरत आहे, ते अत्यंत भीतीदायक आहे. परंतु, कोरोना विषाणूचा अर्थ मृत्यू हा नाही. जगात आतापर्यंत सुमारे ७ लाख २२ हजार लोक कोरोनाबाधित झाले आहे. यापैकी ३३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ५१ हजार लोक पूर्णपणे बरे झाले असून ते सामान्य आयुष्य जगत आहेत.

ज्या ५ लाख ३६ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये ५ लाख ९ हजार म्हणजेच ९५ टक्क्यांचा आजार कमी किंवा मध्यम दर्जाचा आहे. ५ टक्के रुग्ण म्हणजेच २६ हजार जणांची प्रकृती गंभीर आहे. या आकडेवारीवरुन स्पष्ट होते की या आजारात बहुतांश रुग्ण हे बरे होतात.

दुसरीकडे भारतासाठी दिलासादायक बातमी म्हणजे आत्तापर्यंत जवळपास १०० जण करोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. सरकारनं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, जवळपास १०७२ करोनाबाधित सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यातील १०२४ रुग्ण भारतीय तर ४८ परदेशी रुग्ण आहेत. आत्तापर्यंत जवळपास २९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

तसेच अनेक देशात कोरोनावर औषध शोधण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर संशोधनं सुरु आहेत. फ्रान्सनेसुद्धा कोरोना विषाणूवर नवीन औषध सापडल्याचा दावा केला आहे. प्रारंभिक टप्प्यांतील रुग्णांवर हे औषध सकारात्मक परिमाण करत असून, रुग्णाला गंभीर स्थितीत पोहोचण्यापासून हे औषध प्रतिबंधित करते. फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट हॉस्पिटलो युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ संशोधक, प्राध्यापक डिडायर राऊ यांनी नवीन औषधाची चाचणी यशस्वीरीत्या घेतल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

 

News English Summary: The Corona virus has caused panic in the world. The speed at which this virus is spreading is very alarming. But the Corona virus does not mean death. So far, about 7 million 22,000 people have been coronated in the world. Of these, 33,000 have died. So 1 lakh 51 thousand people are fully healed and they are living a normal life. 5 lakh 36 thousand patients are undergoing treatment. Of these, 5 lakh 9 thousand or 95 per cent of the diseases are low or moderate. 5 per cent of the patients ie 26 thousand people are serious. These statistics show that most patients recover from this illness.

 

News English Title: Story how many Corona virus Covid 19 patients cured in the world and India News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x