22 November 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

पीएम रिलीफ फंड असताना 'पीएम-केअर' का? अनेकांकडून शंका उपस्थित

Corona Crisis, Covid 19, PM Care Fund

नवी दिल्ली, ३० मार्च: कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन ट्रस्ट ‘पीएम-केअर’ वर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा ट्रस्ट निधी उभारण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून पीएम रिलीफ फंड किंवा पंतप्रधान मदत निधी अस्तित्वात असताना, पुन्हा ‘पीएम-केअर’ का असे गंभीर प्रश्न आतापासूनच उपस्थित होऊ लागले आहेत.

अनेकांनी कोरोना आपत्तीच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या नवीन फंडाला म्हणजे ‘पीएम-केअर’मागे आत्तापासूनच घोटाळ्याचा उद्देश असल्याचं म्हटलं आहे. काहींच्या मते नवीन फंड तयार करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की तो नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅगच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे आणि एकूण जमा झालेला निधी आणि खर्च झालेला निधी याबाबत कायदेशीर माहिती मिळणं अशक्य होणार आहे.

मात्र यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय किंवा केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिकिया दिलेली नाही. दरम्यान, या विषयाला अनुसरून भाजप नेते नलिन कोहली यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ” सध्या या विषयावर राजकारण करण्याची गरज नाही. सरकार वेगवेगळ्या उद्देशाने मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च करत असतं आणि ते कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे कॅगला कळवले जाते. त्यामुळे सर्वकाही नियमांनुसार केले जाते.

दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी याविषयाला अनुसरून म्हटलं आहे की, पंतप्रधानांनी आकर्षक नामकरण करून या मदतनिधीला पंतप्रधान-केअर असे गोंडस नाव ठेवले असेल. मात्र या फंडाबाबतच्या नियम आणि खर्चाबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. तर राष्ट्रीय आपत्तीच्या काळातही एका विशिष्ट व्यक्तीच्या नावाचं मार्केटिंग करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. मात्र याबाबत सरकारला जनतेला उत्तर द्यावी लागतील असं देखील म्हटलं आहे.

विशेष म्हणजे आधीच्या पंतप्रधान मदत निधीमध्ये अजूनही ३८०० कोटी रुपये शिक्कल आहेत, असा दावा संकेत गोखले यांनी केला असून त्यासंदर्भात त्यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत पत्र लिहून माहिती मागवली होती. त्यामुळे आधीचा शिल्लक निधी त्यांनी वापरला पाहिजे आणि त्यानंतर लोकांकडून नव्या फंडासाठी मागणी करणं उचित ठरलं असतं असं म्हटलं आहे. सध्या वातावरण भावुक असलं तरी भविष्यात याच निधीवरून सरकारला प्रश्न विचारणारे देशद्रोही ठरले नाही म्हणजे झालं असं अनेकांनी आधीच म्हटलं आहे.

 

News English Summary: Many questions are being raised on the new trust ‘PM-Care’ designed to fight the Corona virus infection. This trust was created for fundraising purposes. However, for the past several years, when PM Relief Fund or PM Relief Fund has been in existence, serious questions like ‘PM-care’ have started to arise. Many have called the new fund created in the wake of the Corona disaster a ‘scam’ after PM-care. For some, the main purpose of the creation of a new fund is that it is outside the jurisdiction of the Comptroller and Auditor General, and it is impossible to obtain legal information about the total amount of funds collected and the funds spent.

 

News English Title: Story Corona Crisis PM Care Fund controversy PM Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x