22 November 2024 1:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना हेल्पलाइनवर फोन केला; म्हणाला ४ सामोसे पाठवून द्या...त्यानंतर हे झालं

Corona Crisis, Covid 19 Help Line

रामपूर, ३१ मार्च: जगभरात कोरोनाच्या साथीने अक्षरशा थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात देखील सर्वत्र भीतीचं वातावरण असून सरकारी यंत्रणा देखील अत्यंत दबावाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात देखील रुग्णांचा आकडा हजाराच्या पार गेल्याने चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशभरातील राज्य सरकारने देखील स्वतःच्या परीने सर्व उपाययोजना सुरु केल्या आहेत आणि त्यासाठी कोरोना संबंधित हेल्पलाईन देखील सुरु केल्या आहेत.

मात्र अनेक लोकांना कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीचं अजिबात गांभीर्य अद्यापही नसल्याचंच दिसतं आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमध्ये लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला. परंतु रामपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन सामोसे हवेत अशा विचित्र मागणीचा तगादा लावला. कंट्रोलरुमनं वारंवार ताकीद देऊनही हा माणूस सतत फोन करून त्रास देऊ लागला.

अखेर अधिकाऱ्यांकडून त्याची ही सामोसे खाण्याची इच्छा पूर्ण करण्यात आली, मात्र त्याला खास ‘प्रसाद’ही देण्यात आला. कर्तव्य बजावत असताना पोलिस आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या या व्यक्तीला अद्दल घडावी म्हणून त्याच्याकडून नाला साफ करून घेण्यात आला. रामपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. सामोसे पाहिजे म्हणून सतत कंट्रोलरुमला फोन करुन त्रास देणाऱ्या या व्यक्तीकडून नाला साफ करुन समाजसेवा करुन घेतली असं ट्विट करण्यात आलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.

 

News English Summary: However, many people still find the seriousness of the coronary disease difficult to understand. A helpline number was issued to help people in Uttar Pradesh in the wake of the corona virus. But a person living in Rampur called this helpline number and warned them of such strange demands. Despite repeated warnings from the control room, this man continued to harass her by phone. Eventually, his wish to eat this samosas was fulfilled by the authorities, but he was also given a special ‘Prasad’. While performing his duties, the man who was harassing the police and the staff was cleared of the drain in order to make it happen. Rampur district collectors have shared this post. The tweet has been tweeted that the harasser has cleared his drain and made social service by constantly calling the control room to get Samosa’s wish. This tweet is going viral on social media.

 

News English Title: Story Uttar Pradesh man calls Covid 19 helpline asks for Samosas gift sent with little punishment News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x