22 November 2024 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

कोरोना आपत्ती: मुंबईत महापालिकेकडून तब्बल १४६ परिसर सील

Corona Crisis, Covid 19, BCM Area Seal

मुंबई, ०१ एप्रिल: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनं मुंबई आणि उपनगर परिसरातील एकूण १४६ परिसर पूर्णपणे सील केले आहेत. या सील केल्या गेलेल्या ‘no-go zones’मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत किंवा बाधा झालेले रुग्ण या परिसरातील लोकांच्या संपर्कात आले असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे खबरदारीची पावलं उचलत हे परिसर सील करण्यात आले आहेत. हे परिसर सील करताना इथल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरुच राहिल याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.

दक्षिण मुंबईतील ४८ परिसरांमध्ये करोनाचे संशयित रुग्ण किंवा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रो, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे. वरळीत आठ रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी वरळी कोळीवाड्यातील रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. दक्षिण मुंबईत सर्वाधिक १३ रुग्ण प्रभादेवीच्या चाळीत आढळून आले आहेत. २४ मार्च रोजी येथील एका खानावळ चालवणाऱ्या महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर तीन दिवसानंतर या महिलेचा मृत्यू झाला होता.

तर दुसरीकडे मुंबईतील पश्चिम भागातील ४६ ठिकाणं सील करण्यात आली आहेत. यामध्ये वांद्रे पश्चिम आणि खास या ठिकाणांचा प्रामुख्यानं समावेश आहे. या ठिकाणांमध्ये हिल रोड, एसव्ही रोड, वांद्रे गव्हरमेंट कॉलनी, बिंबिसार नगर यांचा समावेश आहे. सोमवारी बिंबिसारनगर मधील इंग्लंडमधून आलेली एक महिला पॉझिटिव्ह सापडली होती. त्यानंतर हा भागही सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर पालिकेनं संबंधित महिलेच्या कुटुंबीयांचीही करोनाची चाचणी केली आहे.

 

News English Summary: To prevent the spread of the Corona virus, the Mumbai Metropolitan City has completely sealed 146 localities in Mumbai and suburban areas. These sealed ‘no-go zones’ have been reported to have infected patients with corona virus, or the obstructed patient has been exposed to people in the area. Therefore, the precautionary measures have been sealed. While sealing the premises, the Municipality has said that we have taken precautions to ensure that the supply of essential commodities to the people continues.

 

News English Title: Story BMC seals 146 areas that have seen Corona virus positive patients or their contacts News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x