25 November 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
x

No-go zone: मुंबईत आता तब्बल १९१ ठिकाणं सील

No Go Zones, Corona Crisis, Covid 19

मुंबई, २ एप्रिल: मागील दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून ५००० पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मुंबई महानगर पालिकेनं बुधवारी एकाच दिवशी शहरातील ४५ नवे परिसर सील करुन टाकले आहेत. या परिसरांचा समावेश‘no-go zones’मध्ये करण्यात आला आहे. ज्या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळतात किंवा बाधा झालेले रुग्ण या परिसरातील लोकांच्या संपर्कात आल्यानं ज्या भागातील लोकांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो असे भाग ‘no-go zones’मध्ये येतात. तो परिसर पूर्णपणे बंद करण्यात येतो.

या आठवड्यात एकूण १९१ परिसर सील करण्यात आले आहेत.बुधवारी नव्यानं सील करण्यात आलेले बहुतांश परिसर हे उपनगरातले आहेत. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स लावले असून येथील नागरिकांना बाहेर पडण्यास आणि बाहेरच्या व्यक्तीला आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

News English Summary: Meanwhile, Mumbai Metropolitan City has sealed 45 new premises in the city on Wednesday. These areas are included in the ‘no-go zones’. ‘No-go zones’ are areas where coronary infected patients are found or obstructed patients come in contact with the area where people are at higher risk of getting infected. That area is completely closed. A total of 191 premises have been sealed this week. Most of the newly sealed areas are in the suburbs on Wednesday. Police have installed barricades in the area, where citizens are prohibited from leaving and an outside person is allowed to enter.

 

News English Title: Story 45 more areas in Mumbai are now No Go Zones tally of such spots in the city to 191 Corona virus outbreak News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x