22 November 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

१४ एप्रिलनंतरच्या रिझर्व्हेशनला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही

Lock Down, Corona Crisis, Covid 19, Railway Booking

नवी दिल्ली, २ एप्रिल: देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक सेवा ठप्प झाल्यात आहे. लोकल रेल्वे, मेल एक्स्प्रेस गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. रस्ते वाहतूकही बऱ्यापैकी थांबलेली आहे. अनेकांनी एप्रिल आणि मे महिन्याचं आधीपासूनच आरक्षण करून ठेवलेलं आहे. परंतु रेल्वेच बंद असल्यानं ते आरक्षणही स्थगित झालं आहे. १४ एप्रिलपर्यंत आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. पण रेल्वेनं आणखी एक आनंदवार्ता दिली आहे. अशातच आरक्षण सुविधा १४ एप्रिलनंतरही बंदच ठेवणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यावर आता रेल्वेनंच स्पष्टीकरण दिलं आहे. १४ एप्रिलनंतर रिझर्व्हेशनला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.

१५ एप्रिल या तारखेपासून आरक्षण देण्यास कधीही बंदी नव्हती. म्हणजेच १५ एप्रिलपासून आरक्षण करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयआरसीटीसी १५ एप्रिलपासून रेल्वे तिकिटांची बुकिंग सुरू करणार असून, ही सुविधा अंशतः कार्यान्वित होणार आहे. रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे रुळावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

मात्र, या तारखेनंतर कुणाला रेल्वेने बाहेरगावी जायचे असेल तर त्याची तिकिटे ऑनलाइन काढता येतील. रेल्वेची ऑनलाइन तिकीटविक्री अजून सुरू आहे. फक्त तिकीट काउंटर बंद असल्याने तेथे जाऊन तिकीट घेता येणार नाही. मात्र लॉकडाउनची मुदत वाढली तर १४ एप्रिलनंतरची तिकीटी विक्रीही बंद होईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: Due to the lock down in the country, many services have been hampered. Local trains, mail express trains have been closed. Road traffic is also quite halted. Many have already booked the months of April and May. But the reservation has been postponed as the train is closed. By April 14, the reservation was canceled. But the train has given another good news. Rally has been rumored that the reservation facility will remain closed even after April 14, and the railways have now clarified. No reservations have been made for reservation since April 14.

 

News English Title: Story railway big announcement rail lock down reservations journeys after 14th April 2020 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x