22 November 2024 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा

Corona Crisis, Covid 19, PM Narendra Modi

नवी दिल्ली, ३ एप्रिल:  कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ही लढाई एकटा कसा लढू असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. किती काळ ही परिस्थिती राहणार हे सर्वांच्या मनात आहे. पण आपण घरात असलो तरी एकटे नाही, सामूहिक शक्तीने आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत. जनता ईश्वराचा अवतार असतो असं समजलं जातं. देश ही इतकी मोठी लढाई लढताना आपल्या शक्तीचं दर्शन वारंवार घडवून देत आहे. आपला मार्ग अधिक स्पष्ट करतो. कोरोनाच्या अंधकारातून निरंतर प्रकाशाकडे जायचं आहे. कोरोना संकटामुळे गरीब जास्त प्रभावित झाले आहेत. या संकटातून त्यांना नवीन ऊर्जा मिळवून द्यायची आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोणीही एकटं नाहीय असा विश्वास मोदींनी देशातील जनतेला दिला. “आपण एकटे कसे या संकटाला तोंड देऊ असा प्रश्न तुम्हाला घरात बसून पडला असेल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाहीत. भारतातील १३० कोटी लोकं एकत्र या संकटाचा सामना करत आहेत. तुम्ही एकटे नाहीत हे लक्षात ठेवा,” असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

 

News English Summary: We want to remove this darkness from the light that has spread throughout the world due to the epidemic of the Corona virus. For this, on Sunday 5th April, every Indian should give 9 minutes. At nine o’clock, everyone wants to turn off the lights in his house. In these nine minutes, Modi appealed to everyone to stand in the door or balcony, remove the darkness by lighting a candle, lamp or flashlight, a mobile flashlight. At this time, Narendra Modi said that the question of how to fight this battle alone was being raised in the minds of all. Everyone knows how long this situation will last. But even though we are in the house, we are not alone, we are confronting Corona with collective force. People are considered to be incarnations of God. The country is constantly showing its strength in fighting such a great war. Explains your path more. From the darkness of the corona to the constant light. The poor are more affected by the Corona crisis. He said that they want to get new energy from this crisis.

 

News English Title: Story corona virus light candles on Sunday at 9 PM to show solidarity Amid corona virus lock down PM Narendra Modi urges nation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x