22 April 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

त्या तबलिगीकडून महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर अश्लील कृत्य; मुद्दाम नग्न फिरत आहेत

quarantined jamaat, Corona Crisis

नवी दिल्ली, ३ एप्रिल: दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमधून निघालेले तबलिगी जमातीचे लोक देशातील अनेक भागात कोरोना विषाणूचे संक्रमण करण्यासाठी जबाबदार धरले जात आहेत. आता या लोकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तणूक केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. गाझियाबाद येथील एमजीएम रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये ठेवलेल्या जमातीतील १३ रुग्णांनी महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे लोक विवस्त्र फिरत आहेत. त्यामुळे महिला नर्स आणि इतर लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोतवाली ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. गाझियाबादचे पोलिस अधिकारी कलानिधी नैथानी यांनी पीडित व्यक्तींचा जबाब नोंदवून घेतल्याचे सांगत याबाबत निष्पक्ष चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटले. तर जिल्हाधिकारी अजयशंकर पांडे यांनी कोरोना विषाणूवरील उपचारासाठी झटत असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबरील गैरवर्तणूक सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या २५६६ वर पोहोचली आहे. त्यापैकी १९१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील २४ तासांमध्ये ३२८ नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात ३३९, केरळमध्ये २८६, तामिळनाडूमध्ये ३०९, दिल्लीमध्ये २१९, आंध्र प्रदेशमध्ये १३५, राजस्थानमध्ये १३३, तेलंगणामध्ये १२७, कर्नाटकामध्ये १२१, उत्तरप्रदेशमध्ये १२१, मध्यप्रदेशात ९८ रूग्ण आढळून आले आहेत.

 

News English Summary: The people of the Tablighi tribe, departing from Merkaz in Nizamuddin, Delhi, are being blamed for transmitting the corona virus in many parts of the country. Now a new case has emerged that these people have abused the medical staff. At least 13 patients belonging to Quarantine were kept in quarantine at MGM Hospital in Ghaziabad. These people are walking around naked. As a result, the complaint states that female nurses and other people face major problems.

 

News English Title: Story Corona virus quarantined jamaat people misbehave vulgar behave with nurse walking without pants in front of women staff in Ghaziabad News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या