22 November 2024 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

डॉक्टर भक्तांनी उत्साहाने हाॅस्पिटल्सच्या लाइट्स घालवू नये; पेशंट्स व्हेंटीलेटरवर आहेत

Raju Parulekar, Modi Bhakt, Corona Crisis

मुंबई, ३ एप्रिल: कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब भावंडांमध्ये नैराश्येचं वातावरण आहे, म्हणूनच त्यांना निराशेतून आशेकडे न्यायचं आहे. दारात एक दिवा लावताना आपण या लढाईत एकटं नाही असं एकमेकांना सांगून निराशेचा अंधकार दूर करण्याचा संकल्प करायचा आहे असंही मोदींनी सांगितलं मात्र हे करत असताना कोणीही एकत्र यायचं नाही किंवा रस्त्यावर जमायचं नाही, सोशल डिस्टन्सचं भान ठेवून प्रत्येकानं अनुकरण करायचं आहे असाही संदेश त्यांनी देशवासीयांना दिला आहे.

दरम्यान, मोदींच्या या मार्केटिंग टास्कवर सर्वच थरातून टीका होऊ लागली आहे. मोदी भक्तांचा मागील इतिहास पाहता ते उत्साहात काय करतील याची शास्वती देता येणार नाही आणि त्यात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित वर्गाचा देखील समावेश आहे. त्यालाच अनुसरून पत्रकार राजू परुळेकर यांनी खोचक इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे. यावर ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “पुणे, डोंबिवली, पार्ले, दादर भागातील डॉक्टर भक्तांनी उत्साहाने हाॅस्पिटल्सचे सर्व लाइट्स घालवू नयेत…..बरेच पेशंट्स व्हेंटीलेटरवर आहेत अजुन…

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांची ही घोषणा ऐकल्यानंतर चेतन भगत यांनी ट्विटवर काही इमोजी शेअर करत सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होत असतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून चेतन सतत सरकारच्या धोरणांवर टीका करत असतात. यावेळी देखील त्यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केल्यानंतर चेतन यांनी घंटा आणि दिवा यांची इमोजी शेअर केली आहे.

 

News English Summary: This marketing task of Modi has been criticized from all levels. Given the past history of Modi devotees, what they will do with enthusiasm cannot be ruled out, and that includes a large number of well-educated classes. Following this, it is seen that journalist Raju Parulekar gave a right warning.

 

News English Title: Story Journalist Raju Parulekar criticized PM Narendra Modi and Modi Bhakt over marketing during Corona Crisis News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x