22 November 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

कोरोना आपत्ती: अमेरिकेत एका दिवसात १,४८० तर स्पेनमध्ये ९६१ नागरिकांचा मृत्यू

Corona Crisis, Covid 19, American Covid 19 crisis

वॉशिंग्टन, ४ एप्रिल: जगभरात जीवघेण्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस मृतांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झाला आहे. शुक्रवारी अमेरिकेत या विषाणूने एका दिवसात १४८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसापूर्वी अमेरिकेत कोरोनाने ११६९ नागरिकांचा बळी घेतला होता.

तर दुसरीकडे गुरुवारी एकाच दिवसांत स्पेनमध्ये ९६१ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. तर, ५६४५ करोनाबाधित आढळले. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, २६ मार्चनंतर मृतांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, करोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही. शुक्रवार सायंकाळपर्यंत एक लाख १७ हजार ७१० जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ५८७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेनंतर आता स्पेनमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. शुक्रवार सायंकाळपर्यंत इटलीत १ लाख १५ हजार जणांना करोनाची बाधा झाल्याची आकेडवारी होती. तर, १३ हजार ९१५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

त्यानंतर जर्मनीमध्ये शुक्रवारपर्यंत ८९,४५१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चीनमध्ये आतापर्यंत ८१,६२० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. इटली आणि स्पेनमध्ये या विषाणूने सर्वात जास्त थैमान घातले असून याठिकाणी मृतांचा आकडा सर्वात जास्त आहे. जगभरात कोरोनाचे १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.

 

News English Summary: Worldwide, the deadly corona virus has spread and the number of deaths is increasing day by day. The United States, the most powerful country in the world, has the highest prevalence of the corona virus. The virus killed 1480 civilians in the United States on Friday. So one day earlier in the United States, Corona had killed 1169 civilians.

 

News English Title: Story corona virus Covid 19 America sets new global record with 1480 virus deaths in 24 hours News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x