22 November 2024 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय

Covid 19, Corona Crisis, Union Health Ministry

नवी दिल्ली, ४ एप्रिल: करोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी कोणत्या वयोगटामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी किती आहे, याची माहिती देण्यात आली. यामध्ये ० ते २० वयोगटामध्ये ही टक्केवारी ९ इतकी आहे. २१ ते ४० वयोगटामध्ये हे प्रमाण सर्वाधिक ४२ टक्के आहे. ४१ ते ६० वयोगटामध्ये ही टक्केवारी ३३ इतकी आहे. तर ६१ पेक्षा जास्त वयोगटामध्ये हे प्रमाण १७ टक्के इतके आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी ही माहिती दिली.

लव आगरवाल म्हणाले, कालपासून आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०१ ने वाढली आहे. देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९०२ इतकी झाली आहे. काल कोरोनामुळे देशात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने मृत पावलेल्यांची संख्या ६८ इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात १८३ जणांना आजारातून बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मकरझमधील कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंधित तब्बल २२ हजार जणांना देशभरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. देशात तबलीघींसंबंधी १७ राज्यांमध्ये करोनाचे १०२३ रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील एकूण रुग्णांपैकी ३० टक्के आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन अजूनही लक्ष ठेवून आहे आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: The Union Health Ministry on Saturday informed about the age at which the percentage of coronary artery disease was estimated. The percentage is about 9 in the age group of 0 to 20. The proportion is highest in the age group of 21 to 40, at 42 percent. This percentage is 33 in the 41 to 60 age group. In the 61-year-old group, the proportion is 17 percent. This was stated by Union Health Ministry Deputy Secretary Love Agarwal.

 

News English Title: Story highest 42 percent covid 19 patients belong to 21 to 40 years age group says union health ministry corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x