22 November 2024 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना आपत्ती: अमेरिकेत झटपट इस्पितळांच्या उभारणीसाठी लष्कर सज्ज

Corona Crisis, America Covid19, American Corona Crisis, President Donald Trump

वॉशिंग्टन डीसी, ५ एप्रिल: जगभरातील करोना बळींची संख्या आता साठ हजारांवर गेली असून अमेरिकेत एकाच दिवशी पंधराशे बळी गेले आहेत. जगात ११,३३,८०१ करोनाबाधित रुग्ण असून, बळींची संख्या ६०,३९८ झाली आहे. अमेरिका ७४०६, स्पेन ११,७४४, इटली १४,६८१, जर्मनी १२७५, फ्रान्स ६५०७, चीन ३३२६, इराण ३४५२ या प्रमाणे मृतांची संख्या आहे. चीनमधील करोना साथीचा सर्वोच्च कालखंड संपला असला, तरी तेथे पुन्हा दुसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे.

अमेरिका व युरोपात मास्कचा तुटवडा असून ते चीनवर अवलंबून आहेत. न्यूयॉर्कमध्ये लोकांना मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकूण २,७८,००० अमेरिकी लोकांच्या चाचण्या सकारात्मक आल्या असून दर दहापैकी नऊ लोक टाळेबंदीत आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये न्यूयॉर्कमधील मृतांचा आकडा दुप्पट झाला आहे, अशी माहिती न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी दिली. तसेच, या परिस्थितीमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असून, व्हेंटिलेटरच्या फेरवितरणाला त्यांनी परवानगी दिली.

दरम्यान, ट्रम्प यांनी लष्कराची उपाययोजनांमधील भूमिका वाढवत असल्याचे जाहीर केले. पुढील १० दिवस अमेरिकेमध्ये करोनाचा वेगाने फैलाव होण्याची शक्यता असून, काही महिन्यांमध्ये बळींची संख्या एक ते दोन लाखांपर्यंत जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी हजारोंच्या संख्येने बेड व व्हेंटिलेटर तयार करण्याची आवश्यकता आहे. तेथील ५० राज्यांतील १००पेक्षा जास्त केंद्रांवर लष्कराच्या इंजिनीअर कोअरची पथके काम करत आहेत. नऊ हजारांपेक्षा जास्त निवृत्त लष्करी वैद्यकीय अधिकारीही सेवेत उतरले आहेत.

न्यूयॉर्कमध्ये लष्कराने काही तासामध्येच एका सांस्कृतिक केंद्राचे रूपांतर २५०० बेडच्या हॉस्पिटलमध्ये केले. न्यूयॉर्कबरोबरच न्यू जर्सी, मिशिगन, पेनसिल्वानिया, एरिझोना, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा या राज्यांमध्ये लष्कर काही काळासाठीचे हॉस्पिटल आणि अन्य सुविधांची उबारणी करत आहे. तसेच, वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठीही लष्कराची पथके सक्रिय झाली आहेत, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

 

News English Summary: Trump also announced that the military is expanding its role in measures. Corona is likely to spread rapidly in the United States over the next 6 days, and the number of victims is expected to increase from one to two lakh in a few months. To cope with this situation, thousands of beds and ventilators need to be built. Army Corps of Corps teams are working at more than 4 centers in 4 states. More than nine thousand retired military medical officers have also joined the service. Within a few hours, the Army transformed a cultural center into a two-bed hospital in New York. In addition to New York, the Army is recovering temporary hospitals and other facilities in the states of New Jersey, Michigan, Pennsylvania, Arizona, California, Florida. Also, military teams have been active in supplying medical supplies, Trump noted.

 

News English Title: Story American Military helping to build temporary hospitals after corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x