22 November 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आपत्ती भारतात सुद्धा, त्यामुळे इंडिया फर्स्ट; ट्रम्प यांना राहुल गांधींचे प्रत्युत्तर

Covid19, Corona Crisis, Rahul Gandhi

नवी दिल्ली, ७ एप्रिल: कोरोना विषाणूच्या संक्रमणामध्ये केंद्र सरकारने मंगळवारी जीवरक्षक म्हणून समजल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल या दोन औषधांवरील निर्यात बंदी काही प्रमाणात उठविली. त्यानंतर लगेचच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे.राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रत्युत्तराची भाषा वापरणे ही मैत्री नाही. ज्या देशांना सध्या गरज आहे त्यांना भारताने मदत केली पाहिजे. पण त्याचवेळी सध्याच्या स्थितीत जीवरक्षक ठरलेली औषधे भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा न केल्यामुळे भारताला गर्भित इशारा दिला होता. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बोललो होतो. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध पुरवले तर अमेरिका तुमची आभारी राहील, असे मी त्यांना सांगितले. मोदींना ते शक्य झाले नाही तरी ठीक आहे. मात्र, याला जशास तसे उत्तर नक्कीच दिले जाईल. किंबहुना ते का दिले जाऊ नये, असा धमकीवजा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आगामी काळात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका भारताची अडवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सगळ्यानंतर भारताकडून २४ औषधे आणि औषध निर्मिती घटकांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठवले आहेत. मात्र, यामध्ये कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या हायड्रोक्लोरोक्वीन आणि पॅरासिटमॉल या औषधांवरील निर्बंध अजूनही कायम आहेत. देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतरच या औषधांची निर्यात करण्यात येईल. त्यासाठी औषध कंपन्या आणि परराष्ट्र मंत्रालय देशातील कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा करून निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

 

News English Summary: The central government on Tuesday lifted the export ban on a couple of drugs, such as hydroxychloroquine and paracetamol, believed to be pesticides. Immediately after that, Congress leader Rahul Gandhi has cast his role on it. India should help those countries in need right now. But at the same time, medicines that are preserved in the current state should be made widely available to Indians.

 

News English Title: Story Congress MP Rahul Gandhi hits back American president Donald Trump over Hydrochloroquine drug supply from India Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x