19 April 2025 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

वाघ दरवाजा - इतिहासास माहित नसलेला प्रसंग

Story Wagh Darwaja, Raigad, Chhatrapati Shivaji Maharaj

९ फेब्रुवारी १६८९ येसाजी आणि सिदोजी फर्जंद यास कडेलोट केले..११ मार्च १६९ औरंगजेबाने तुळापुरी संभाजी राजे व कवी कलश यास जीवे मारून शिरच्छेद केला..२५ मार्च १६८९ औरंगजेबाने झुल्फिरखानास पाठवून रायगडास वेढा घातला….किल्ले रायगड च्या मावळतीकडे मोगली झुल्फिरखानच्या छावणीवर अजून सूर्यकिरण आले नव्हते.

किल्ले रायगडने टकमक टोक व हिरकणी टोक हे आपले दोन सव्य -अपसव्य बाहू पसरवून झुल्फिरखानाची छावणी रोखून धरली होती..कवटाळली होती..किल्ले रायगडच्या महादरवाजा कराल जबड्यापासून झुल्फिरखान सुदूर छावणी करून होता..झुल्फिरखानाला मावळतीकडील किल्ले रायगडचा एकच महादरवाजा माहित होता आणि तो त्याने रोखून धरला होता.

रायगडवाडी व पाचाड येथील मोघली छावणीतील अंमलदार अजूनही बिछायतीवर लोळत होते..दस्तुरखुद्द झुल्फिरखान सुद्धा पाचाड येथील आऊसाहेबांच्या कोटातील वाड्यात निजलेला होता..किल्ले रायगडला वेढा घालताना रायगडच्या बेलग कड्याची चहूअंगांनी मन ऊर्ध्वभागी झोकून पाहणी करतना प्रत्येक मोघली अंमलदाराची पागोटी रायगडच्या पायाखालील धुळीत पडून माखली होती गच्च रानातील वन्य श्वापदांचा भीतीने त्या अंमलदरांनी थातूर मातुर पाहणी केली होती..रायगडची उंची, सरळकोट भीषण तासीव कडे आणि सभोवतालचे घनदाट जंगल ध्यानात घेऊनच झुल्फिरखानने किल्ले रायगडची ज्ञात रहदारीची दरवाजाकडील बाजू आपल्या परीने रोखून धरली होती..

वाघ दरवाजाबाहेर एका चिकाच्या टोपल्यास दोरखंड बांधून ठेवलेला होता..वाघदरवाजा बाहेरील डोंगर धारेवर एक मेढ खोलवर पुरलेली होती ..मेढीच्या बेळक्यात दोरखंड टाकून टोपला डोंगर धारेवर सुरक्षित चार हशमांनी हातातील धरला..हश्मांचा आधार घेत संताजी घोरपडे टोपल्यात बसले..चार हशमांनी हातातील दोरखंड हळू हली ढिला सोडला ..टोपल्याच्या पालन उभ्या कडासी लगट करीत खाली खाली जाऊ लागला ..संताजी घोरपडे खाली उतरले ..घटकभरात रिकामा टोपला पालन वर ओढून घेतला होता ..तद्नानंतर त्या टोपला पाळण्यातून खंडेराव दाभाडे खाली उतरले..पालन पुन्हा वर येताच राजाराम महाराज पाळण्यात बसून खाली गेले..

त्यानंतर तारारानिसाहेब व राजसबाईसाहेब व अंबिकाबाईसाहेब एकापाठोपाठ एक टोपलीच्या पाळण्यातून खाली उतरल्या..अनुक्रमे प्रल्हाद निराजी ,खंडो बल्लाळ आणि बाबाजी निलो हेही वाघदरवाजा खाली पाळण्यातून खाली पोहोचले….वाघ दरवाजाखालील त्या किर्र रानात वाघांचे काळीज असणारीच माणसे उतरू शकली होती.. ..शिवरायाने दूरदर्शीपणे किल्ले रायगडास निर्मिलेल्या आपत्कालीन दरवाजा खानास ठाऊक नवता आणि म्हणूनच किल्ले रायगड वेढनाऱ्या झुल्फिरखान ह्याची ह्या दिशेला गस्त नावती .हे मराठ्यांच्या हेरांना ठाऊक होते..आजही तुम्ही सकाळी-दुपारी-सायंकाळी वाघ दरवाजात एकाकी गेलात तर आसमंतातील निर्व शांत तेच भंग करीत तो वाघ दरवाजा हि कथा सांगण्यास आपला जबडा उघडतो..

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या