22 November 2024 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना आपत्तीत भारतीयांच्या गरजा मोदींच्या प्राधान्यक्रमात नाहीत; काँग्रेसची टीका

Covid19, Corona Crisis, Corona Virus

नवी दिल्ली, ०९ एप्रिल: बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.

कोरोनाबधितांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची अमेरिकेला निर्यात करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारने या औषधाच्या देशातील साठ्याची माहिती घेतली होती का? तसेच या औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांबाबत विचार केला होता का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

तसेच भारताचे नागरिक आणि त्यांच्या गरजा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्राधान्यक्रमात नसल्याचा आरोपही काँग्रेसने ट्विटरवरून केला आहे. अनियोजितपणे केलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांची मजुरी बुडाली तर मोठ्या प्रमाणात उपासमार दूर नाही, या अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी केलेल्या भाकीटाचा पुनरुच्चार काँग्रेसने केला आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारने उद्योगजगतासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली नाही. सरकारला दुसरे पॅकेज जाहीर करायला किती वेळ लागेल, अशी विचारणाही काँग्रेसने केली आहे.

 

News English Summary: Did the central government take stock of the drug’s reserves in the country before deciding to export hydroxychloroquine to US for coronary artery disease? Did you also think about the companies that manufacture this drug? Such questions have been raised by the Congress. The Congress also alleged that the citizens of India and their needs are not in the prime minister’s priority. Congress has reaffirmed its proposals by economist Amartya Sen that the wages of millions of laborers are wiped out due to unplanned lockdown. During the lockdown, the government has not announced a financial package for the industry. The Congress has also asked how long it will take for the government to announce another package.

News English Title: Story corona virus issue export medicine to America congress aggressive against PM Narendra Modi Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x