29 April 2025 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

केवळ २४ तासात भारतात कोरोनाचे ६२० नवे रुग्ण

Covid19, Corona Crisis India, Corona Virus

नवी दिल्ली, १३ एप्रिल : जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १८ लाखांवर गेला असन १ लाख १४ हजार जणांनी जीव गमावला आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ४४७ झाली आहे. आतापर्यंत २७३ जणांनी यामध्ये जीव गमावला आहे. तर ७६५ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आपले मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आपापले कामकाज संभाळण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजेपर्यंत कोरोना विषाणूच्या एकूण ७ हजार ९८७ ऍक्टिव्ह केसेस भारतात आहेत. तर आतापर्यंत ८५७ लोकांनी यावर मात केली आहे किंवा त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांच्याकडे वाहने आहेत आणि दिल्ली परिसरात राहतात असे मंत्री आणि अधिका-यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे.

भारतात सर्वाधिक कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रविवारी राज्यात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १६, पुण्यातील ३, नवी मुंबईतील २ आणि सोलापूरच्या १ रुग्णाचा समावेश आहे.

 

News English Summary: Worldwide the number of coroners has risen to 18 lakhs and 1 lakh 14 thousand have lost their lives. The number of coroners in the country has increased to 8,447. So far 273 people have lost their lives in this. So 765 patients have recovered. Meanwhile, the central government has directed its ministers and senior officials to take over their affairs in the ministry.

News English Title: Story India Corona Crisis records 620 New Covid19 cases in 24 hours News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या