अर्थव्यवस्थेला तब्बल ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज
नवी दिल्ली, १४ एप्रिल: देशात केंद्र सरकारकडून २५ मार्चपासून राबवण्यात येत असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन आज, मंगळवारी संपत आहे आणि तो यापुढे देखील ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली असून विश्लेषकांच्या मते, अर्थव्यवस्थेला ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या लॉकडाऊनदरम्यान बहुतांश कंपन्या बंद राहिल्या. विमानसेवा बंद करण्यात आल्या. रेल्वे जागच्या जागी थांबल्या. दळणवळणही बंद झाले. कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. २५ मार्चपासून या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे भारतातील ७० टक्के आर्थिक व्यवहार थांबले.
देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश वातावरणातून बाहेर येऊ पहात असताना, तसेच आर्थिक वातावरण सकारात्मक होत असताना करोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. यामुळे लॉकडाऊन ही काळाची गरज असली तरी, मंदीतून बाहेर येऊ पाहणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी चुकीच्या वेळी लॉकडाऊन झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा २०२०-२१ साठी आर्थिक विकास कमी होणार आहे. या लॉकडाऊनमुळे दरदिवशी देशाचे ३५ हजार कोटींचे (४.६४ अब्ज डॉलर) नुकसान होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आता २१ दिवसांनंतर जीडीपीचे ९८ अब्ज डॉलरने किंवा सुमारे ७.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
ऍक्यूट रेटिंग्ज अँड रिसर्च लि.ने यापूर्वी लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दररोज ४.६४ अब्ज डॉलरचे (३५००० कोटी रुपयांहून अधिक) नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला होता. याप्रमाणे २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावधीत जीडीपीला सुमारे ९८ अब्ज डॉलरचे (७.५ लाख कोटी रुपये) नुकसान होईल.
लॉकडाऊनदरम्यान केवळ आवश्यक सामान, कृषी, खाण, जीवनावश्यक सेवा आणि काही आर्थिक आणि आयटी सेवांना परवानगी दिली होती. सेंट्रम इन्सिट्टयूशनल रिसर्चने म्हटले आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत मिळत असतानाच या विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. यामुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशात पुन्हा एकदा आर्थिक विकास दर मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
News English Summary: The 21-day lockdown, which was implemented by the central government in the country from March 25, ends today, Tuesday and has been extended till May 3. The lockdown has worsened the country’s economy and according to analysts, it is estimated that the economy will suffer a loss of Rs 7-8 lakh crore.
News English Title: Story biggest lockdown may have cost rupees 7 to 8 lakh crore of Indian Economy amid Corona virus Crisis Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News