22 November 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

चिंता वाढली! राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा अडीच हजारांवर

Covid19, Corona Crisis

मुंबई, १४ एप्रिल: राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होताना दिसत नाहीत. राज्यात रोज सरासरी शंभर करोनाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरचं आवाहन वाढलं आहे. गेल्या १२ तासांत राज्यात १२१ करोना बाधित आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या २४५५वर गेली आहे.

मुंबईत ९२, नवी मुंबईत १३, रायगडमध्ये १, ठाण्यात १०, वसई-विरारमध्ये ५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. तर रत्नागिरीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रत्नागिरीत अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी साखरतर येथील ६ महिन्यांच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित महिलेच्या घरातील हे बाळ असून यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या ६ वर जाऊन पोहचली आहे.

रत्नागिरीत एका सहा महिन्यांचा बाळाला करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. रत्नागिरी शहरापासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या साखरतर गावात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबातीला बाळाला करोनाची लागण झाली आहे. याच कुटुंबातील महिलेला करोनाची लागण झाली होती. यानंतर बाळाची तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

News English Summary: The number of Corona patients in the state does not appear to be decreasing day by day. With the average number of hundred coronary patients being found in the state every day, the appeal to the health system has increased. In the last 12 hours, 121 crores have been infected in the state and the number of patients in the state has increased to 2455.

News English Title: Story corona virus 92 new cases Mumbai city Maharashtra total reached to 2455 Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x