यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होणार; शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी
नवी दिल्ली, १५ एप्रिल: एकीकडे कोरोना विषाणू संक्रमणामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि दुसरीकडे वाढत्या पाऱ्यामुळे घरात असलो तरी उकाड्याने जिवाची घालमेल होत असताना एक सुखावणारी बातमी आली आहे. देशात यंदाही सरासरी इतकाच पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नोंदविला आहे. जूनपासून देशात पावसाळ्याला सुरुवात होते. त्याआधी दोन ते तीन वेळा हवमानशास्त्र विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येतो. बुधवारी पहिला अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी गुड न्युज…
मान्सून यंदा नॉर्मल राहणार…
96 ते 104 टक्के राहण्याची शक्यता …
भारतीय हवामान विभागाची माहिती pic.twitter.com/jDrsVXEdZR— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 15, 2020
नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी (९६ ते १०४ टक्के) पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्यानं व्यक्त केलेला हा पहिला अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी इतका पाऊस होईल. या कालावधीत अल निनोमुळे होणारा परिणाम सामान्य असेल. पावसाच्या चारही महिन्यांमध्ये हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे पाऊस चांगला होईल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली.
This year we will have a normal monsoon. Quantitatively the monsoon rainfall, during the monsoon season 2020, is expected to be 100% of its long period average with an error of +5 or -5% due to model error: Madhavan Rajeevan, Secretary, Ministry of Earth Sciences (MoES). pic.twitter.com/gjgM0Ta1N8
— ANI (@ANI) April 15, 2020
मागील काही महिन्यांत देशभरातील विविध राज्यांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पाऊस आणि गारपीटीचा सर्वाधिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचा मान्सून बळीराजासाठी सुखावह असणार अशीच चिन्हं तूर्तास वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन लक्षात येत आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमानाचं चित्र अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करण्यात येणार आहे.
News English Summary: On the one hand, there has been a tidying up of news of Corona virus infection being locked down everywhere, and on the other hand, with the rising flood, even though life is getting worse. The Indian Meteorological Department has forecast that the country will receive similar rainfall on average. The rains begin in the country from June. Two to three times the monsoon forecast is predicted by the aeronautics department. The first forecast is Wednesday.
News English Title: Story India likely to have a good monsoon this year predicts weather department of India News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS