24 November 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

१७ सरकारी तर १५ खाजगी VDRL लॅब्स; देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात

Covid19, Corona Crisis, VDLR Labs, Covid19 Testing

मुंबई, १५ एप्रिल: देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट असून येथील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे. राज्यात आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शासकीय यंत्रणा, पोलीस, डॉक्टर, आरोग्य अधिकारी हे सगळेच जण करोनाच्या संकटाशी सामना करत आहेत. मात्र महाराष्ट्रात करोनाग्रस्त कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. मात्र दुसऱ्याबाजूला सरकारी पातळीवर शर्थीचे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे. देशात मोठ्या प्रमाणावर सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात घेतल्या जातं असल्याची आकडेवारी समोर आली आहे आणि त्यामुळे जसजसे रिपोर्ट हाती येत आहेत त्यामुळे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी देखील झपाट्याने बदलत आहे.

राज्यात आज १७ सरकारी तर १५ खाजगी VDRL लॅब्स कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात येतं आहेत. विशेष म्हणजे हे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचं स्वतः राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: There are 17 government and 15 private VDRL labs operating in the state today and a large number of tests are being conducted. In particular, the ratio is the highest in the country, said the secretary of the medical education and medicine department of the state. Sanjay Mukherjee has made it clear.

News English Title: Story Maharashtra now has 17 Government and 15 private VDRL Labs making our testing capacity the highest Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x