22 November 2024 6:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जगभरात कोरोनामुळे १,२७,१४७ बळी, तर रुग्णांची संख्या २० लाखांवर

Covid19, Corona Crisis, World Corona Crisis

वॉशिंग्टन, १५ एप्रिल: चीनच्या वुहान शहरापासून वेगानं संसर्ग होत गेलेला कोरोना व्हायरस आता थांबण्याचं नाव घेत नाहीय. एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दुप्पट वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. २०० हून अधिक देशांमध्ये याचा मोठा फटका बसला आहे. सर्वात जास्त धोका युरोपीय देशांना असून आतापर्यंत या व्हायरसमुळे युरोपमध्ये बाधित झालेल्या ७० टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात अमेरिकेत तब्बल २२२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख २५ हजारांहून अधिक झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर चार महिन्यांच्या आतच करोनाच्या संसर्गाने एक लाखांहून अधिक बळी घेतले आहेत.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १,२७,१४७ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २० लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या २०,०८,१६४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे ४,८६,२४७ लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.

भारतातही एप्रिल महिन्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगानं पसरत आहे. देशभरात १४ एप्रिलपर्यंत COVID-19 चे १२११ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे भारतातला कोरोनाग्रस्तांचा आकडा १०,८१५ झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३५३ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ११९० जणांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. ते बरे होऊन घरी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरचा वाढता धोका लक्षात घेत देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.

 

News English Summary: The number of coroners worldwide is steadily increasing and serious conditions have arisen. Corona has lost more than 1,27,147 lives so far. More than two million people are reported to be infected. World coronary population has increased and the number of patients has reached 20,08,164. On the other hand, 4,86,247 people are reported to be recovering. Corona rage is on the rise worldwide. All countries are facing Corona.

News English Title: Story corona virus confirmed cases Covid19 Worldwide exceed 2008164 over 127147 died Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x