22 November 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

यूपीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले

Uttar Pradesh, Covid19, Corona Crisis

लखनऊ, १५ एप्रिल: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आणि पोलीस आघाडीवर जाऊन लढत आहेत. मात्र या मंडळींना अनेकदा हल्ल्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा अनेक घटना वारंवार पुढे येत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स आणि पोलिसांच्या मनोधर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशीच एक उत्तर प्रदेशातली घटना समोर येत आहे. मुरादाबाद जिल्ह्यातल्या नागफनी भागात नवाबपूरा मस्जिद हाजी नेब या भागात संशयीत रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि दोन पोलीस जखमी झालेत.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे मेडिकल टीम आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना संकटकाळात आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस आपत्कालीन स्थितीत दिवसरात्र लोकांची सेवा करत आहेत. या लोकांवर हल्ला करणे ही घोडचूक आहे ती माफ करु शकत नाही. या घटनेची तीव्र निषेध त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, दगडफेकीमध्ये एकूण तिघेजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर आणि एका फार्मासिस्टचा समावेश आहे. आरोग्य विभाग किंवा पोलीस अधिकाऱ्यांवर नागरिकांनी असे हल्ले करण्याची ही पहिली वेळ नाही. कोरोनाच्या तणावग्रस्त वातावरणात यापूर्वीही असे धक्कादायक प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आपली सुरक्षितता दूर लोटत नागरिकांच्या हितासाठी सातत्याने दिवसरात्र काम करणाऱ्या या कोरोना वॉरिअर्सना मिळणारी ही वागणूक देशातील नागरिकांच्या एकंदर मानसिकतेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत आहे.

 

News English Summary: Doctors and police are leading the fight against Corona. However, these congregations often face attacks. Many such incidents are occurring frequently. This is likely to affect the mood of doctors and police. One such incident is coming up in Uttar Pradesh. In Nawabpura Masjid Haji Neb area of ​​Nagfani area of ​​Moradabad district, a group of suspected patients was attacked. One doctor and two policemen were injured in the attack.

News English Title: Story people pelted stones at medical team police personnel who gone to take the family of a Covid 19 positive in Moradabad Covid19 News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x