25 November 2024 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२,३८० वर, ४१४ रुग्णांचा मृत्यू

Corona Crisis, Covid19, India Corona Crisis

नवी दिल्ली, १६ एप्रिल: भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपासून ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ४१४ वर पोहचला आहे. तर देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२,३८० वर पोहचला आहे.

मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर आणि आग्रासारख्या प्रमुख शहरात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. या शहरामध्ये करोनाबाधिंताची संख्या जास्त आहे. या सर्व भागांना रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आले असून येथे १०० टक्के लॉकटाउन पाळण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रमुख शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील मात्र लॉकडाउन कायम असेल असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ७१८ पैकी ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोना एकही रुग्ण तिथे आढळलेला नाही. यामुळे सरकार या जिल्ह्यांना कोरोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे २-३ आठवडे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

News English Summary: In India, the outbreak of corona virus is increasing. Patients infected with the corona virus are increasing day by day. According to the Health Department data, 39 coronary artery patients have died during treatment since Tuesday evening. Therefore, the death toll in the country has reached 414. Another 1,118 coronary artery disease has been reported in the country. Therefore, the number of coronary artery patients has reached 12,380.

News English Title: Story Corona virus Union health ministry says 12 thousand plus corona patient in the country Covid 19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x