19 April 2025 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

VIDEO - महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून चिंता

Covid19, Corona crisis, Union Health Minister

मुंबई, १६ एप्रिल: कोरोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १९०० पेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ७१८ पैकी ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोना एकही रुग्ण तिथे आढळलेला नाही. यामुळे सरकार या जिल्ह्यांना कोरोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे २-३ आठवडे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर आणि आग्रासारख्या प्रमुख शहरात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. या शहरामध्ये करोनाबाधिंताची संख्या जास्त आहे. या सर्व भागांना रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आले असून येथे १०० टक्के लॉकटाउन पाळण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रमुख शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील मात्र लॉकडाउन कायम असेल असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: There is a picture that the situation is still under control while Corona is trying to stop the spread. The number of coroners in Maharashtra has reached 2916. At least nine people were killed in Maharashtra on Wednesday. So far 232 patients have been found to be Corona-positive. More than 1900 of these patients are from Mumbai and the rest are from Maharashtra. 187 people have died in Maharashtra.

News English Title: Story Union Health Minister worried about corona crisis status in Maharashtra state Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या