लॉकडाऊन हा केवळ तात्पुरता पर्याय आहे, ते या आजारावर उत्तर नाही - राहुल गांधी
नवी दिल्ली, १६ एप्रिल: देशभरात कोरोना व्हायरसमुळे तणावाची परिस्थिती असताना मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि येत्या काळात दिसणारे त्याचे परिणाम या मुद्द्यांवर काँग्रेस्या राहुल गांधी यांनी भाष्य केलं. लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही, हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला.
मी गेल्या काही काळापासून भारत आणि परदेशातील अभ्यासकांसोबत कोविड १९ विषयी संवाद साधत आहे, असं स्पष्ट करत लॉकडाऊन करण्याने कोरोनावर मात करणं शक्य नाही. उलटपक्षी यामध्ये चाचण्या करणं हे सर्वात प्रभावी शस्त्र ठरणार आहे. ज्या पार्श्वभूमीवर त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवून त्यांची योग्य आखणी करुन देशभरात चाचण्यांचं सत्र सुरु करण्याचा सल्ला सरकारला दिला.
तसेच लॉकडाऊन हा केवळ कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी तात्पुरता पर्याय आहे. ते काही या आजारावर उत्तर नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, सध्या आपण सगळेच गंभीर परिस्थितीतून जात आहोत. देशातील सर्व नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी अशा वेळी एकत्रितपणेच काम केले पाहिजे. मी कोरोना विषाणू संक्रमणासंदर्भात देशातील आणि परदेशातील अनेक तज्ज्ञांशी बोलत आहे. हा विषय नेमकेपणाने समजून घेत आहोत. त्यातून मला इतकेच दिसले की लॉकडाऊन हा केवळ तात्पुरता पर्याय आहे. ते काही या आजारावर उत्तर नाही.
नरेंद्र मोदी यांच्याशी माझे अनेक गोष्टींबद्दल मतभेद आहेत. परंतु, सध्या वेळ आहे ती करोनाशी लढण्याची… एकत्र येण्याची आणि व्हायरसशी दोन हात करण्याची, असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारला सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं.
News English Summary: Lockdown is only a temporary option to prevent corona virus infection. Congress leader Rahul Gandhi has said that it is not the answer to the disease. Rahul Gandhi said, “At present, we are all in critical condition. All citizens and political parties in the country must work together at such a time. I have been talking to a number of experts from across the country and abroad regarding the Corona virus infection. We understand this topic precisely. So much so that I found that lockdown is only a temporary option. Some of it is not the answer to this illness.
News English Title: Story Lockdown not a solution to fight Covid 19 need to ramp up testing Congress MP Rahul Gandhi News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार