21 November 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या ३७०० विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं

Lockdown, Corona Crisis, Covid19, foreigners returned

मुंबई, १७ एप्रिल: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० विमान उड्डानाद्वारे सुमारे ३७०० परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यात आले आहे. बुधवारी विमानतळावरील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय आणि देशव्यापी विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.

लॉकडाउनमुळे २४ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय सेवा स्थगित करण्यात आल्या. यामुळे अनेक परदेशी नागरिक भारतात अडकून पडले आहेत. असे ३७०० नागरिक मुंबईत होते. देशभरातील सर्व प्रवासी विमानसेवा स्थगित करण्यात आल्याने या सर्व नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली होती. त्यांच्या देशातील विमानसेवा कंपन्यांनी या नागरिकांना घेऊन जाण्यासाठी विशेष विमानसेवा सुरू केली होती. अशी २० विमाने मुंबईच्या विमानतळावरून सोडण्यात आली. लंडन, अटलांटा, फ्रॅन्कफर्ट, सिंगापूर, पॅरिस व टोक्यो या प्रमुख शहरांचा या विशेष विमानसेवेत समावेश होता.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सांगण्यात आले आहे की, परदेशी प्रवाशांना सोडताना विमानतळ आणि बोड्रिंग येथे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी घेण्यात आली होती. यासाठी विमानतळावर प्रवेश केल्यापासून विमानात चढण्यापर्यंत विमानतळाने कठोर तपासणी प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया येणार्‍या प्रवाशांनाही तितकीच लागू असणार आहे.

 

News English Summary: Lockdown has been extended to May 3 to prevent the spread of the Corona virus. About 3700 foreign nationals have been dispatched to their country by flying 20 flights from Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai. This information was provided by an airport official on Wednesday. International and nationwide airlines have been shut down during the lockdown, which was announced to curb Corona’s infection.

News English Title: Story after lockdown 3700 foreigners returned to their country Corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x