केंद्र सरकार दिवाळखोरीत निघालंय यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही - पंजाबचे मुख्यमंत्री
चंदीगड, १७ एप्रिल: कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन हा उपाय असूच शकत नाही. लॉकडाउन उठले की विषाणूू पुन्हा त्याचे काम सुरु करेल, असे मत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असेही त्यांनी सुचविले.
व्हिडिओ पत्रकार परिषदेत बोलताना गांधी असेही म्हणाले की, मी देशातील व परदेशातीलही अनेक तज्ज्ञांशी बोललो. त्यांचेही म्हणणे असेच आहे. ‘लॉकडाउन’मुळे आरोग्य यंत्रणा सज्ज करायला थोडी उसंत मिळते, एवढेच. ते असेही म्हण़ाले की, विषाणूपासून बचाव करण्याच्या नादात आपण देशाची अर्र्थव्यवस्था खड्ड्यात घालू शकत नाही असं देखील राहुल गांधी काल संवाद साधताना म्हणाले होते.
दरम्यान, पंजाबमध्येही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात शिस्तीची सक्ती केली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून राज्यांशी समन्वय आणि संवाद होत नसल्याचा दावा केला आहे. करोनाशी संबंधित करण्यात आलेल्या उपाययोजनांशिवाय कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्याचबरोबर चर्चाही केंद्राकडून राज्यांशी करण्यात आली नाही असं ते म्हणाले.
‘राज्यांकडून करण्यात येणाऱ्या मागण्यांसंदर्भात केंद्राकडून मदत केली जात आहे का?’ या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले,’केंद्र सरकार दिवाळीखोरीत निघालं आहे, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आरोग्यासंदर्भात उद्भभवलेल्या अभूतपूर्व अशा संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय गंगाजळीतून निधी घेऊ शकते. कारण राज्यांना निधीची गरज आहे. सर्व राज्य आपत्तीच्या टोकावर आहेत. राज्यांकडे उत्पन्नाचा कोणताही मार्ग नाही. आता केंद्रानं मदतीसाठी पुढे यायला हवं. आपण १९१८ मध्ये निर्माण झालेल्या स्पॅनिश फ्लू नंतर पहिल्यांदा भयानक संकटाला तोंड देत आहोत. ही कधीही निर्माण न झालेली परिस्थिती आहे असं त्यांनी म्हटलं.
Sharing with you all my interview with @IndianExpress. https://t.co/25aDNgPWV2
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) April 17, 2020
News English Summary: Speaking on the question, ‘Is the Center being assisted by the demands of the states?’ Therefore, the Central Government can seek funding from the National Antarctic to tackle the unprecedented health crisis.
News English Title: Story Punjab State CM Amarinder Singh on Covid 19 crisis nobody believes that the center government is bankrupt News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार