22 April 2025 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT
x

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांकडून घरभाडे वसुली ३ महिने पुढे ढकला; सूचना प्रसिद्ध

Covid19, Corona Crisis, House Rent

मुंबई, १७ एप्रिल: कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असून उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. या काळात अनेकांचे आर्थिक उत्पन्नही थांबले आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचीही भीती आहे. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्याने लोकांसमोर मोठं संकट उभं राहणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही घरभाडे भरणे कठीण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या लोकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयातून एक पत्रकच निर्गमित करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वत:चं घर नसलेल्या कुटुंबांसमोर तर दुहेरी संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे भाडेकरूंना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण विभाग पुढे सरसावला आहे. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत घर भाडं वसुली पुढील तीन महिने पुढे ढकलावी. भाडं थकल्यानं कोणत्याही भाडेकरूंना घरांमधून बाहेर काढलं जाऊ नये, अशा सूचना राज्यातल्या सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोविड १९ मुळे बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने आणि एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला कोविड १९ या साथीच्या रोगाबरोबरच कठीण आर्थिक परिस्थितीलाही सामोरं जावं लागत आहे. राज्यात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असून आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे भाडेकरूंना ते राहत असलेल्या घराचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे, ही वस्तुस्थिती आहे, असं या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

News English Summary: Home Secretary Sanjay Kumar has instructed the homeowners in a letter to the homeowners to postpone the rent collection of the occupants in the rented house for at least three months. All homeowners are being advised that no tenants should be evicted from their rental home if they do not pay their rent on time or if the rent is exhausted during this three month period, the housing department said in a letter.

News English Title: Story Maharashtra state government instructs no collection of house rent for 3 months News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या