22 November 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

पिझ्झा खाल्ला नाही तर आपण मरणार नाही; तेलंगणात लॉकडाउन कालावधीत वाढ

Covid 19, Corona crisis, Telangana Lockdown

अमरावती, २० एप्रिल: देशात करोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केलं आहे. परंतु या निर्णयानंतर आता तेलंगण सरकारनं लॉकडाउनचा कालावधी वाढवत राज्यात ७ मे पर्यंत लॉकडाउन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

तेलंगणमध्ये विदेशातून आलेल्या ६४ जणांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, ७ मे पर्यंत राज्यात वाढवण्यात आलेल्या लॉकडाउनचं अतिशय कठोररित्या पालन केलं जाईल याची काळजी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी भारतातील दिल्लीत एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्यानंतर लोकांमध्ये खाण्या-पिण्याचं सामान ऑर्डर करताना भीतीचं वातावरण आहे, कारण त्यांने तब्बल ७२ ऑर्डर घरपोच दिल्या होत्या. अशातच आता बहुराष्ट्रीय कंपनी मॅकडॉनल्ड्सच्या सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ही घटना सिंगापूरमधील आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कंपनीने काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवलं आहे.

त्यामुळे तेलंगणात लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याव्यतिरिक्त सरकारनं झोमॅटोस स्विगी आणि पिझ्झा घरपोच पोहोचवण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जर आपण पिझ्झा घेतला नाही तर आपल्याला काही होणार नाही, असं या नंतर मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं. यानंतर ५ मे रोजी परिस्थितीत पाहून मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं.

 

News English Summary: In addition to extending the lockdown period in Telangana, the government has also decided to ban the delivery of Zomato Swiggi and pizza houses. If you do not have pizza, then nothing will happen to you, ”the Chief Minister said after this. Following this, the government made it clear that further decisions would be taken at the Cabinet meeting on May 5.

News English Title: Story Telangana state government extend lockdown till 7th May Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x