ती दोघं...!

त्या दिवशी तिची माझी शेवटचीच भेट झाली, बोलायला काहीच नसल्यामुळे फक्त नीट राहा, काळजी घे, तब्बेत सांभाळ आणि सुखी राहा, एव्हढेच सतत निर्थक बोलत बसलो हा “क्षण” आमच्या आयुष्यात कधी ना कधी येणार होताच आणि आलाही, खंत एव्हढीच ज्या क्षणाची कल्पना आम्हा दोघांना सुरुवातीपासून होती तो इतका अचानक आणि आयुष्याच्या टर्निंग पोईंट च्या नंतर येईल असे वाटले तोच “क्षण” यमा सारखा अचानक दारात आलेला पाहून जरा पावले डगमगली…
ती तिच्या अश्रुंना वाट करून देत होती आणि मी तिला म्हणत होतो हसत खेळत आयुष्यात आलीस तशीत हसत मुखाने जा… ती काहीच बोलली नाही जाता जाता एकच विचारून गेली, मला संगतोयेस काळजी घे, तब्बेत सांभाळ…तू स्वतःलाही हे लागू करशील का? मी काहीच बोलू शकलो नाही बाईक सुरु केली आणि तिच्या बसण्याची वाट पाहू लागलो…
कसेबसे डोळे पुसत बसली ती शेवटचंच खांद्यावर हात ठेऊन, तिचा तो थरथरणारा स्पर्श बरंच काही बोलत होता, चेहरा नाही बघत असलो तिचा तरी ती रडत आहे अजूनही मला कळत होत…तिला तिच्या घराजवळ आणून बाईक थांबवली मी, तर आपला प्रवास संपलाय हे तिला कळलही नाही सावरासावर करत स्वताच्या मनाची बाईक वरून उतरू लागली…
मी तिला थांबवलं जरा आणि एकच म्हणालो आयुष्याचे सहप्रवासी बदललेत म्हणून मार्गही बदलायचे नसतात अन आपण पाहिलेले किंवा कुणाला दाखवलेले स्वप्न सोडूनही देयचे नसतात, प्रयत्न आपण दोघांनीही केले ते स्वप्न पूर्ण करण्याचे पण आता नाहीच होणार पूर्ण हे दोघांना सुरुवातीपासून माहित होतेच ना तरी स्वप्ने एकमेकांना दाखवलीच अन आता तुटली ती सारी स्वप्ने म्हणून का कुरवाळत बसलीस मान्य तुझ्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो पण तुला जगायला आणि जगत राहायला शिकवलंय कुणावर नाही पण मला तुझ्यावर अजूनही विश्वास आहे जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तू तरी जगत राहणार आहेस…
ती अजून काहीच ऐकू शकली नाही हुंदका दाटून आला होता ती तोंडावर हात ठेऊन घराच्या दिशेने पळत गेली पुन्हा त्या दोघांची गाठभेट झाली की नाही कल्पना नाही येव्हढ निश्चित ती दोघ कुठेही असलीत तरी जगत राहतील एकमेकांसाठी, एकमेकांसोबत नाही जगू शकले पण एकमेकांच्या आठवणी जपण्यासाठी तरी जगतील…
लेखक: पियुष खांडेकर
Story English Title: Prem Katha ‘Ti Dogha’ written by Piyush Khandekar on Maharashtranama.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भरवशाचा डिफेन्स कंपनी शेअर, मजबूत कंपनी फंडामेंटस, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | 'BUY' रेटिंग, जिओ फायनान्शिअ शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Safe Investment Scheme | ट्रीपल बेनिफिट आणि मजबूत परतावा मिळणार, व्याजातून होईल 20,500 रुपयांची कमाई
-
GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA
-
Vedanta Share Price | 530 रुपये टार्गेट प्राईस गाठणार वेदांता शेअर, डीमर्जर प्लॅनिंगमुळे पुढे मोठी कमाई होणार - NSE: VEDL
-
TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
TATA Motors Share Price | रेलिगेअर ब्रोकिंग फर्म बुलिश, टाटा मोटर्स टार्गेटशेअर्स खरेदीला गर्दी, संधी सोडू नका - NSE: TATAMOTORS
-
IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
-
IREDA Share Price | एक दिवसात 8.25% परतावा दिला इरेडा कंपनी शेअरने, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: IREDA
-
Income Tax Rule | पगारदारांनो, 1 एप्रिल पासून इन्कम टॅक्स नियमांत होत आहेत मोठे बदल, लक्षात ठेवा अन्यथा खूप नुकसान होईल