4 April 2025 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | पडझडीतही तज्ज्ञांचा विश्वास कायम, पुढील टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटलं? - NSE: RPOWER Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर स्वस्तात खरेदी करून ठेवा, पुढे मोठा परतावा मिळेल, संधी सोडू नका - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये 4.46 टक्क्यांची घसरगुंडी, पुढे काय असेल टार्गेट प्राईस? - NSE: YESBANK TATA Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स लोअर सर्किटवर आदळले, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटलं पहा - NSE: TATASTEEL Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, ही फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
x

प्रायश्चित्त..!

Laghu Katha Prayaschit, Piyush Khandekar

काही दिवसांपासून पाऊस माझ्याशी खेळ करत आहे, मी कुठे अडकलेला असतो तेव्हा बाहेर मनसोक्त बरसत असतो, त्याची माझी हल्ली चूकामुकच होत आहे, मला भेटायची ओढ त्यालाही नसेल का?? मी भेटत नाही म्हणून कदाचीत एकटाच रडत नसेल का?

त्याची चाहूल लागून भेटायला येईल मी अशी खुळी अशा तो ठेवत नसेल का? जसे पावसासाठी आपण तरसतो आपल्यासाठी तो तरसत नसेल का? खुळ्या मनाचे खुळेच विचार… माणसांसारखा तोही स्वार्थी झाला असेल… आपापल यायचं बरसायच अन निघून जायचं… जेव्हढे आपल्या थेंबात एकवटले तेव्हढे क्षण एकवटून घेऊन जायचं… आणि जेव्हढे निसटले त्याचं प्रायश्चित्त कधीतरी कुठल्याश्या क्षणात करत बसायचं…

बरसत असतो मी तेव्हा प्रत्येकाला कोणी ना कोणी आठवत राहतो… बहुतांश रोमॅन्स, शाळा, कॉलेजची कॅंटीन, चौपाटीवरची भेळ…आणि काय काय…

बाहेर रिपरिप सुरु असते तेव्हा माझ्या मनात खूप राग येतो… एकदाचा मुसळधार कोसळ आणि बंद हो… पण नंतर एक विचार मनात येतो आपल्याला आपल डोक लपवायला निदान घर तरी आहे अथवा ऑफिसचे छत… पण रोडवर राहणार्‍या गरिबांच काय… मुंबई सारख्या धारावी झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांच काय… एक मुंबईतच झोपडपट्टी आहे अस नाही… प्रत्येक गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा एक अविभाज्य घटक आहे झोपडपट्टी… ज्या छिद्र पडलेल्या कौलांच्या झोपडीत दोन वेळच जेवण शिजनही कठीण असत त्या घरात रिपरिपणारा पाऊसही किती थैमान घालत असेल…

कौलांच्या छिद्रातून घरात येणार्‍या पावसाच्या थेंबांना एकवटायला घरातल एक जर्मनच भांड लावलं जात… भांड भरलं का ते पाणी बाहेर फेकून पुन्हा त्याच छीद्राखाली लावलं जात… पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही… थांबेल थांबेल म्हणत संध्याकाळच्या जेवणाची वेळ होते आणि जेवण शिजवायच भांड त्या छिद्रखाली सापडलं असत… दुसर पर्यायी भांड त्या गरीब घरात कोणतच नसत… आणि आपण बस… पडतोय पड रे बाबा पड खूप गरम होतंय तेव्हढाच गारवा तरी मिळेल या अनुषंगाने पावसाचे कृत्यार्थ होऊन जातो…

अन पाऊस न बरसता प्रायश्चित्त करत राहतो… एक दिवस तरी विना पावसाचा दिलासाच त्या झोपडीतल्या नाट्याला देत राहतो… पाऊसही कधीकधी आपल्या थेंबांना आवर घालत असतो… अन कुठेतरी क्षणभरचा दिलासा देत राहतो… पुन्हा नवीन दिवस… नवा पाऊस जुनेच नाट्य अन जुनेच श्रोते…. नव्याने….

 

लेखक: पियुष खांडेकर

Story English Title: Short Story Prayaschit written by Piyush Khandekar on Maharashtranama.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या