देशात २४ तासांत १,३३६ नवे रुग्ण, ४७ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली, २१ एप्रिल: कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल १८ हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ४७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार ७५९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ४७ जणांचा मृत्यू तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे.
(Source ANI)#CoronaCrisis pic.twitter.com/dTx1SkXl7C— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) April 21, 2020
आयसीएमआरच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, करोना सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण सकारात्मक अहवाल आढळलेल्या जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे करोना बाधितांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जात आहे.
सर्दी, ताप आणि खोकला असणाऱ्यांना करोना संशयित म्हणून आयसोलेट किंवा क्वारंटाइन करण्यात येत आहे. पण दिल्लीमध्ये मागील २४ तासांत आढळलेल्या करोनाबाधित रूग्णांना सर्दी, खोकला आणि ताप या सारखी कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत. त्यामुळे अशा रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. दिल्लीत आढळून आलेल्या जवळपास २५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षण दिसली नाही आणि हे चिंताजनक आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर इथे काम करणाऱ्या किमान १०० लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
News English Summary: The country is ready to face Corona and all precautionary measures are being taken. However, the number of corona victims in the country is increasing day by day. It is learned that the number of corona viruses in India has increased to 18,000. In the last 24 hours, 47 people have lost their lives due to coronas across the country and 1,336 new coronary patients have been found. As a result, the total number of coroners in the country has reached 18 thousand 601.
News English Title: Story Corona virus 1336 more Covid 19 cases India total count reaches 18601 Corona Crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS