क्षणात सारे तुटले...!
शेवटी उरलो एकटाच, राहीलोही एकटाच शेवटी तेच झाल ज्याची कल्पना केली नव्हती, सजलेली सारी स्वप्ने इतस्तः पसरली माहित नाही अस का झाल, नव्हतोच कधी एकमेकांचे होणार तर का एकमेकांना भेटलो? जर दुरावणारच होतो तर जवळ तरी का आलो? काही काही कळत नाहीये उद्या रंगपंचमी आठवते सोबत खेळायचं ठरवलं होत..
एकमेकांच्या रंगात रंगायच ठरलं होत कुणाला नाही पण उगाच ठरवलं कारण सगळंच तुटलं आणि तेही अस तुटलं की पुन्हा जोडायची पण फार भीती वाटते, तरी मनात विचार येतो तुटणार होत म्हणून तुटलं आता पुन्हा मागे वळून पहायचं नाही बस पुढे चालत राहायचं पण पुढे लगेचच तू येतेस, पुन्हा तिथेच तशीच अगदी कधी गेलीच नाहीस अशी…उगचचं एव्हढ्या पुढे गेलो (प्रेमाच्या) नात्यात…
आपण येव्हढ पुढे जायलाच नको होत, आता होतात त्या फक्त वेदना, नकळत ओघळतात ते अश्रू, ढासळतात ती खंबीर पावले, आवरावे लागतात स्वतःच स्वतःचे हुंदके, अन् आवाज करतात तीच तुटणारी स्वप्ने, बेचीराखं मने… का मला तू अशी घट्ट बिलगतेस पुन्हा की सोडायचं नावच घेत नाहीस, त्याचं माझ्या कुशीत झोपायला तुझा हिरमुसलेला चेहरा मला बघवत नाही, तुझ ते काकुळतीला येऊन मिठीला तरसने सहन होत नाही पण हतबद्ध मी उघड्या डोळ्यांच्याच स्वप्नात… हताश मी मागासलेल्या समाजात, उपरा मी अपुराच तुझ्या सुखात, कणाकणाने अजून किती तुटायचं एक क्षण जगायला किती क्षण मरायचं आता मी स्वतःला समजवले आहे तुला विसरायचं एक सुखद स्वप्न म्हणून, तुला आठवायचं एक गोड आठवण म्हणून, अन पुन्हा तुला जाऊ देयच एक वाट एकटीच म्हणून…अन् मागे मी उरणार एक शब्द ओठातच अडलेला, मनातच आलेले अन् कोर्या पानातच विरून गेलेला…
प्रत्येक अक्षराने घायाळ होत राहणारा… एक शब्द बनायसाठी अक्षरांचे घात-प्रतीघात सहन करणारा तो एकच शब्द मी बर्याचदा तुटून नव्याने पुन्हा बनणारा… आणि तू तीच अश्रूंची भिजरी पायवाट कायम माझ्या पावलांसाठी तरसलेली, ओसाड झालेली वळणावळणावर दिसेनाशी होत गेलेली…
लेखक: पियुष खांडेकर
Marathi Poem English Title: Marathi Kavita Kshant Tutale Saare written by Piyush Khandekar on Maharashtranama.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL