20 December 2024 9:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

बहिरं विजयी बेडूक...!

Marathi Inspirational Story, Winner Frog, Marathi Laghu katha, Marathi Stories, Marathi kavita

खूप वर्षा पूर्वी एका सरोवरामध्ये खूप बेडूक राहत होते. सरोवराच्या मधोमध धातूचा एक खांब होता तो खांब ते सरोवर बनवणाऱ्या राजाने बांधला होता. खांब खूप मोठा आणि चिकट होता.

एक दिवस बेडकांच्या मनात आले की आपण एक प्रतियोगिता भरउया. प्रतियोगितेत भाग घेणाऱ्या बेडकाला सरोवराच्या मधोमध असणाऱ्या धातूच्या चिकट खांबावर चढावे लागणार होते आणि जो बेडूक पहिला चढेल तो विजेता घोषित केला जाईल असे ठरले.

प्रतियोगितेचा दिवस आला, चारी दिशांमध्ये खूप गर्दी जमली. आसपासच्या सर्व परिसरातून खूप बेडूक आले. परिसरात प्रतियोगितेचा एकच आवाज घूमू लागला.

प्रतियोगिता सुरु झाली…..

परंतु खांबाला पाहून कोणत्याही बेडकाला असे वाटत नव्हते की प्रतियोगितेतील कोणताही बेडूक या खांबावर चंढू शकेल…..

आजूबाजूला असेच ऐकू येत होते.

“अरे हे खूप अवगड आहे”

“ही प्रतियोगिता आपण कशी जिंकणार”

“जिंकण्याची शक्यताच नाही , इतक्या चिकट खांबावर कसे चढणार”

जो कोणी बेडूक वर चढण्याचा पर्यन्त करत होता तो अपयशी होत होता.

थोडा वर चढून तो परत खाली पडत होता,

प्रतियोगितेतील खूप बेडूक पुन्हा-पुन्हा पर्यन्त करत होते…

परंतु प्रतियोगितेतील बेडकांच्या तोंडून एकच आवाज येत होता, “हे होऊ शकत नाही, हे अशक्य आहे”,

आणि प्रतियोगितेतील जे उसाही बेडूक होते ते हे एकूण हताश झाले आणि त्यांनी आपला पर्यन्त सोडून दिला.

परंतु प्रतियोगितेतील त्या मोठ्या बेडकांच्यामध्ये एक लहान बेडूक होता, जो सारखा-सारखा वर चढण्याचा पर्यन्त करत होता आणि खाली

पडत होता, परंतु परत त्याच उमेदीने उटून वर चढत-चढत तो खांब्याच्या वर पोहचला आणि प्रतियोगिता जिंकला.

त्याच्या विजयावर बाकीच्या बेडकांना खूप आश्चर्य वाटले, सर्व बेडूक त्या विजेत्या बेडकाला घेरून उभे राहिले आणि विचारू लागले, तू हे असंभव काम कसे संभव केले, भले तुला आपले लक्ष्य प्राप्त करण्याची शक्ती कोटून मिळाली, जरा आम्हाला पण सांग की तू हा विजय कसा मिळवलास?”

तेव्हा मागून एक आवाज आला.., ” त्याला काय विचारताय, तो तर बहिरा आहे”

मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामध्ये आपले लक्ष्य प्राप्त करण्याची क्षमता असते, पण आपण आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे आपल्याला दुसऱ्याच्या तुलनेत कमी लेखतो आणि आपण जी मोठी-मोठी स्वप्न पाहतो ती पूर्ण न करताच जीवन जगतो. खरतर आपल्याला आवश्यकता या गोष्टीची पाहिजे की आपल्याला कमकुवत करणाऱ्या हर एक आवाजा प्रती बहिरे आणि हर एक दुश्या प्रती आंधळे राहिले पाहिजे आणि मग बघा आपल्याला विजयी होण्यापासून कोण रोखू शकत नाही.

 

Marathi Inspirational Story Title:  The Winner Frog on Maharashtranama.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x