22 November 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

देशातील ६४ टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील

Corona Crisis, Covid 19, India

नवी दिल्ली, २२ एप्रिल: राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढताना दिसतोय. महाराष्ट्रात 5218 कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 722 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 251 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वर्धा, भंडारा, गडचिरोली, नांदेडमध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नाही.

दरम्यान, देशात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात कोरोनामुळे मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या तीन राज्यात एकूण मिळून ४१७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण मृतांच्या आकड्यापैकी हे प्रमाण ६७ टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये १९ आणखी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मृतांचा आकडा २५१ वर पोहचला आहे. गुजरातमध्ये २४ तासांत १९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९० वर पोहचला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ७६ वर पोहचला आहे.

विशेष म्हणजे मुंबई आणि ठाण्यात लोकांनी गर्दी करू नये आणि घराबाहेर पडू नये म्हणून नाक्यानाक्यावर पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. तरीही लोक घराबाहेर पडत असल्याचं चित्रं आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसही करोनाच्या विळख्यात सापडले असून आतापर्यंत ६४ पोलिसांना लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

 

News English Summary: The number of coronary artery disease patients is increasing day by day. In the three states of Maharashtra, Gujarat and Madhya Pradesh, the number of deaths due to corona is increasing day by day. A total of 417 coronary artery patients have died in these three states. So far, it is 67 per cent of the total coronary artery mortality in the country.

News English Title: Story 64 percent deaths due to corona virus in the country in Maharashtra Gujarat and Madhya Pradesh Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x