22 November 2024 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

२०२०-२१ आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर ०.८ टक्के राहील - फिच रेटिंगचा अंदाज

Fitch Rating, India Growth, Corona Crisis

नवी दिल्ली, २३ एप्रिल: करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे. भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते. जागतिक मंदीचे स्वरुप आणखी गंभीर होणार असल्याचा फिचचा अंदाज आहे. २०२० मध्ये चीनची अर्थव्यवस्था ०.७ टक्क्यांनी वाढेल असं देखील म्हटलं आहे.

दरम्यान, मार्च महिन्यामध्ये झालेल्या देशाच्या आयात-निर्यात व्यापाराची अधिकृत आकडेवारी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मार्च महिन्यात निर्यात २१.४१ अब्ज डॉलर झाल्याचे स्पष्ट केले आहे. मागील वर्षाच्या मार्च महिन्याशी तुलना करता निर्यातीमध्ये ३४.५७ टक्के घट झाली आहे. त्यामुळे सन २०१९-२० या आर्थिक वर्षामधील निर्यात ३१४.३१ अब्ज डॉलर झाली आहे. मार्च महिन्यात ३१.१६ अब्ज डॉलरची आयात झाली असून घसरणीचे हे प्रमाण २८.१५ टक्के आहे.

केंद्राने देखील सध्या मोठी आर्थिक बचत करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

 

News English Summary: The corona virus has already found the economy in crisis. Now, Fitch rating, an international credit rating agency, has raised concerns. Fitch has further downgraded India’s growth rate for the fiscal year 2020-21.

News English Title: Story Fitch Rating Slashes India Growth Forecast Yet Again Pegs It At 0 8 For FY21 Dmp 82 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x