22 November 2024 2:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अमेरिका: २४ तासांत ३,१७६ रुग्णांचा मृत्यू; एकूण मृतांचा आकडा ५० हजारावर

Covid 19, Corona Crisis, US Corona Crisis

नवी दिल्ली, २४ एप्रिल: चीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे आज जगातले अनेक देश लॉकडाऊन आहेत. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका या देशांत या विषाणूचा तांडव सुरु आहे. अमेरिकेत तर या विषाणूचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ३ हजार १७६ आहे. येथे आतापर्यंत ५० हजार लोकांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार दिली आहे.

जगातील जवळपास २१० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. अनेक देशांनी करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला आहे. तर, अमेरिकेत पूर्णपणे लॉकडाउन जाहीर करण्यात आला नाही. मात्र, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जगभरात २७ लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली असून मृत्यूची संख्या १ लाख ८० हजारांहून अधिक झाली आहे.

अमेरिकेत सध्या ८ लाख ८७ हजार ७८७ लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे, तर आतापर्यंत ८१ हजार ७९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान हा काही फ्ल्यू नाही, हा तर अमेरिकेवर झालेला हल्ला आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये नैमित्तिक पत्रकार परिषदेत त्यांनी आपली ही भूमिका मांडली.

इतर देशांच्या तुलनेत भारतात ५ लाख चाचण्यांमागे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे प्रमाण ४.५ टक्के आहे. अमेरिकेत २६ मार्चला ५ लाख चाचण्यांनंतर ८० हजार रुग्ण सापडले होते. यावरून जगाच्या तुलनेत भारताचे धोरण आतापर्यंत प्रभावी ठरल्याचा दावा पर्यावरण सचिव व एमपॉवर्ड ग्रुप-२ चे अध्यक्ष सी. के. मिश्रा यांनी केला आहे.

 

News English Summary: Many countries in the world are locked down today due to the outbreak of the corona virus, which started in Wuhan, China. The virus is endemic in Italy, Spain, Germany and the United States. The virus was found in the United States. The number of deaths from the corona virus in the United States in the last 24 hours is 3,176. As many as 50,000 people have been killed so far, according to Johns Hopkins.

News English Title: Story America records 3176 Corona virus deaths in 24 hours total fatalities near 50000 Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x