22 November 2024 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

इस्पितळं बंद अन कोरोना रुग्ण रस्त्यावर, भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरात-यूपीत भीषण अवस्था

Covid 19, Corona Crisis, Uttar Pradesh

लखनऊ, २५ एप्रिल: देशात गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता देशांत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २४ हजार ५०६ वर पोहोचला आहे. या आकडेवारीपैकी भारतात सध्या १८ हजार ६६८ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ५ हजार ६३ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

गुजरातच्या अहमदाबाद शहराला करोनानं घट्ट विळखा घातल्याचं चित्र दिसतंय. करोना व्हायरस संक्रमित व्यक्तींची संख्या इथं दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतेय. याच दरम्यान अहमदाबाद मनपा आयुक्तांनी संपूर्ण शहरालाच हादरवून टाकणारी शक्यता व्यक्त केलीय. येत्या चार दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पटीनं वाढणं थांबलं नाही तर मे महिन्याच्या शेवटपर्यंत शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८ लाखांपर्यंत पोहचेल, असं अहमदाबादचे आयुक्त विजय नेहरा यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटलंय. यापूर्वीच अहमदाबादमध्ये सरकारी इस्पितळाच्या बाहेर कोरोना रुग्णांचे कसे हाल होतं आहेत ते समोर आलं आहे.

दुसरीकडे भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेबद्दल वेगळं सांगायला नको. परिणामी कोरोना आपत्तीत तिथल्या आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ समोर आला आहे. तसेच इथल्या इस्पितळांमध्ये वैद्यकीय कर्मचारी देखील इस्पितळं बंद ठेवून निघून जातात ते देखील समोर आलं आहे. परिणामी कोरोनाची लागण झालेले रुग्ण इस्पितळाबाहेर उघड्यावरच बसून राहतात त्याचे दुसरेच परिणाम समोर येऊ शकतात. परंतु भाजप सरकार असलेल्या राज्यांमधील खरं वास्तव लपवलं जातं आहे अशी देखील शंका स्थानिक पत्रकार बोलून दाखवत आहेत.

उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सच्या गेटवर करोना रुग्णांना घेऊन बस पोहोचली होती. मात्र रुग्णालयात गेट बंद असल्याने रुग्णांना फूटपाथवर वाट पाहत बसावं लागलं. सैफई येथे हे हॉस्पिटल आहे. आग्रा येथून या सर्व रुग्णांना सैफई येथील सरकारी रुग्णालयात पाठवलं जात होतं. सरकारी बसमधून या रुग्णांना ११६ किमी प्रवास करत आग्रा येथून सैफई येथे पाठवण्यात आलं होतं.

करोनाचे रुग्ण फूटपाथवर बसले असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. एका व्हिडीओत सर्व रुग्ण फक्त मास्क घालून बसलेले दिसत आहेत. यावेळी दोन पोलीस कर्मचारी त्यांना सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगत आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णांसोबत पाठवलं असावं असं सांगितलं जात आहे.

 

News English Summary: The bus carrying patients had reached the gate of Uttar Pradesh University of Medical Sciences. However, as the gate of the hospital was closed, the patients had to wait on the sidewalk. The hospital is at Saifai. All the patients were being shifted from Agra to the government hospital in Saifai. The patients were flown 116 km by government bus from Agra to Saifai.

News English Title: Corona virus Lockdown 69 Covid 19 Patients Wait On Footpath Outside Hospital For Admission In Uttar Pradesh.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x