22 November 2024 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

एका व्हायरसने सुरू केलेल्या या रोगाचा प्रसार सरकारनेच अधिक केला - राजीव बजाज

Rajiv Bajaj, Sanjeev Bajaj, Lockdown, Covid 19

मुंबई, २५ एप्रिल : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून त्याची गरज नसल्याचे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले. एका व्हायरसने सुरू केलेल्या या रोगाचा प्रसार सरकारनेच अधिक केल्याचेही ते म्हणाले.

कोणत्याही समस्येवर अमर्याद काळाचे लॉकडाउन हा उपाय होऊ शकत नसल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना बजाज म्हणाले. देशातील तरूणांना कामावर जाण्यासाठी सरकारने परवानगी देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ६० वर्षांवरील व्यक्तींना घरी बसवावे मात्र तरुणांना कामावर जाऊ द्यावे. त्यामुळे आर्थिक गाडा चालू राहील, असेही मत त्यांनी व्यक्त केले. लॉकडाउन हे अनियंत्रित असून त्यामुळे देशापुढील आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाली असल्याचेही बजाज म्हणाले.

दुसरीकडे अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळावी यासाठी अनेक देशांनी उद्योगांना आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. भारतात असे पॅकेज कधी मिळणार असा सवाल बजाज फिनसर्व्ह आणि बजाज होल्डिंगचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी केला आहे. ट्विटर हॅण्डलवर बजाज यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी मोदी सरकारने लॉकडाउनच्या काळात गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुऱ्या आहेत असं म्हणत नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका केली होती. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. मोदी सरकारने गरीबांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आखाव्यात आणि त्यांना भरीव मदत करावी असाही सल्ला बॅनर्जी यांनी दिला होता.

लॉकडाउन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात थेट अर्थ सहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन दिले. मात्र हे उपाय पुरेसे नाहीत” असंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं होतं. “भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग हा आधीच मंदावला होता. अशात करोना व्हायरसचं संकट कोसळलं. अशा खडतर काळात भक्कम आर्थिक पॅकेजची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

 

News English Summary: Rajiv Bajaj, managing director, Bajaj Auto, said the corona lockdown had crippled the economy and was not needed. He also said that the government had spread the disease, which was started by a virus.

News English Title: Story Corona virus we must think about unnecessary lockdown says Industrialist Rajiv Bajaj Covid 19 News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x