22 November 2024 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

ती सूचना होती, या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही - अमेय खोपकर

Corona Crisis, Ameya Khopkar, Covid 19, Saamana Newspaper

मुंबई, २५ एप्रिल : टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

राज यांच्या मागणीत दम आहे व त्यांनी अनेक जिवांच्या कोरड्या घशांची काळजी घेणारी मागणी केली आहे. त्यामुळे हे ‘कोरडवाहू’ श्रमिक लोक राज यांची ‘तळी’ उचलून धरतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, असं सांगतानाच पण ही मागणी करून दोन शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या. राज यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली?, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

याबाबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मैं किस पथ से जाऊँ? असमंजस हैं भोलाभाला.खूप दिवस झाले. हल्ली कुणीच विचारत नाही मला अशा शब्दात ‘मधुशाला’ मधली ही ओळ खास बोल बच्चन राऊतसाठी आहे. नागू सयाजी वाडीत बसून शब्दांचे बुडबुडे काढणारे संजय राऊत हे सध्या आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही या भावनेने पछाडलेले दिसतात. अन्यथा राज ठाकरेंनी केलेली सूचना त्यांच्या कार्यकारी टाळक्यात शिरली असती. वेळ काय आणि यांचं चाललंय काय? डाईन, वाईन वगैरे शब्दांचे खेळ करत लॉकडाऊनमध्ये वेळ बरा जाण्यापलिकडे फार काही निष्पन्न होणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

त्याचसोबत राज ठाकरेंनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना केली, हे या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. त्यामुळेच मनसेच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा असंही अमेय खोपकर म्हणाले.

काय आहे नेमकी पोस्ट;

 

News English Summary: The suggestion made by Raj Thackeray has been made without any intention. There is a need to take some measures in a legal way without falling into the trap of morality when the government coffers are in shambles. Where does the question of lifting the pond come from? And not only alcohol, but also restaurants and other transactions were suggested to be started, it does not seem to have crept into the empty heads of these weeping Raut’s.

News English Title: Story corona virus crisis MNS leader Ameya Khopkar slams Shivsena MP Sanjay Raut after editorial in saamana News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x