22 November 2024 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबई पोलिस दलातील ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू

Mumbai Police, Covid 19, Corona Crisis

मुंबई, २५ एप्रिल: देशातील सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश मिळालेलं नाही. राज्यात गेल्या गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद झाली असून ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८१७ झाली आहे. तर मृतांची संख्या ३०० च्या पुढे गेली असून ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या कचाट्यात पोलीस आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारीही येत आहेत. कोरोनाचा कहर वाढत असतानाच, मुंबईत एका ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता.

संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत ९६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ९६ पोलिसांत १५ अधिकाऱ्यांचा आणि ८१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली.

 

News English Title: Police and medical personnel are also involved in the Corona scuffle. A 57-year-old police constable in Mumbai has died due to corona. The concerned police was working at Wakola police station in Mumbai. Worli was a resident here.

News English Title: Story 57 year old police constable died due to Corona virus infection in Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x