22 November 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले? ट्रम्प सुद्धा मोदींप्रमाणे थेट पत्रकार परिषद टाळण्याची शक्यता

Covid 19, Corona Crisis, US President Donald Trump, Press Conference

वॉशिंग्टन, २६ एप्रिल : शरीरामध्ये जंतुनाशक द्रव्ये (डिसइन्फेक्टन्ट) टोचून कोरोना विषाणू नष्ट करता येतील का किंवा त्याला मारण्यासाठी शरीराच्या आत अल्ट्रा व्हायोलेट (यूव्ही) किरणांद्वारे उपचार करता येतील का या गोष्टींचा अभ्यास करावा, तसे प्रयोग करावेत, अशी अजब सूचना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अमेरिकेतल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी टीकेची झोड उठविली आहे. तसेच, राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, असे आवाहन जंतुनाशक द्रव्यांच्या उत्पादकांनी जनतेला केले आहे. आर्द्र्रता व सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास कोरोना विषाणू इतर वेळेच्या तुलनेत अधिक वेगाने नष्ट होतात, असे अमेरिकेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री बिल ब्रायन यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी कोरोनाबाधितांवर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करण्यास किंवा घरात वापरले जाणारे ब्लीचचे इंजेक्शन देण्यास सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून यावर तिखट प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आपण हे विनोदाने म्हटल्याचे सांगितले.

तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेचा हेतू काय आहे, जेव्हा पारंपारिक मीडिया केवळ प्रतिकूल प्रश्न विचारतात आणि सत्य दाखवताना तथ्यांना योग्यप्रकारे समोर ठेवण्यास नकार देतात. त्यांना चांगली क्रमवारी मिळते आणि अमेरिकन जनतेला केवळ बनावट बातम्या मिळतात. हा वेळ आणि प्रयत्नांचा अपव्यय आहे.

कोरोनाबाधितांना इंजेक्शनद्वारे ब्लीज देण्याच्या सल्ल्यानंतर झालेल्या वादानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट केले आहे. कोरोना विषाणूबाबत दररोज होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी वेळ काढणे आवश्यक नाही, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. आपल्या या टि्वटच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषद बंद करण्याच्या बातम्यांना एकप्रकारे त्यांनी दुजोराच दिला आहे. सध्याच्या परिस्थितिमुळे पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना तिखट प्रश्न विचारले जातात. दररोज सायंकाळी विविध वृत्त वाहिन्यांवर ट्रम्प यांची पत्रकार परिषद चर्चेच्या केंद्रस्थानी असते.

जगभरात सर्वत्र फैलाव झालेल्या जीवघेण्या करोना व्हायरसने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत अक्षरशा थैमान घातले आहे. मागील चोवीस तासांत अमेरिकेत तब्बल २ हजार ४९४ जाणांचा करोनाने बळी घेतला आहे. यामुळे अमेरिकेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या संख्या आता एकूण ५३ हजार ५११ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत तब्बल नऊ लाख ३६ हजार २९३ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

News English Summary: US President Donald Trump has tweeted following a controversy over the injection of coli vaccines. There is no need to make time for the daily press conference about the corona virus, he said in his tweet. Through his tweet, he has in a way confirmed the news of the closure of the press conference.

News English Title: Story Donald Trump says briefings not worth his time after disinfectant gaffe amid corona virus Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x