22 November 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

अमेरिका कोरोनासमोर हतबल, आतापर्यंत ५४,००० जणांचा मृत्यू

Covid 19, Corona crisis, US Corona Crisis

वॉशिंग्टन, २७ एप्रिल: जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २ लाख ५ हजार ९६५ वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत २९ लाख ७२ हजार ५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानं १ हजार ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी आकडेवारी रविवारी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं रात्री उशीरा जाहीर केली. अमेरिकेत आता कोरोना विषाणूच्या संसर्गानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा ५४ हजार ८४१ वर पोहोचला आहे तर ९ लाख ६४ हजार ९३७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी कोविड -१९चा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमधील रूग्णालयात दाखल झाला आणि तिथून कोरोना साथीचा हा आजार अवघ्या जगभरात पसरला. वृत्तसंस्था पीटीआयने, चीनची अधिकृत न्यूज एजन्सी शिन्हुआच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, वुहानमध्ये कोविड -१९चा आता एकही रुग्ण शिल्लक नाही. ७६ दिवस म्हणजेच किमान अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर अखेर 8 एप्रिलला वुहानमध्ये लॉकडाऊन उघण्यात आलं.

 

News English Summary: As the scourge of corona begins in the world, the number of corona patients is increasing day by day. The death toll from corona worldwide has reached 2 lakh 5 thousand 965. So far, 29 lakh 72 thousand 55 people have been infected with corona in the world.

News English Title: Story over 54000 Covid 19 deaths in hardest hit America News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x