22 April 2025 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत राज्यांना धोरण ठरवावे लागणार

Corona Crisis, Covid 19, PN Narendra Modi, Meeting With Chief Ministers, Lockdown

नवी दिल्ली, २६ एप्रिल: देशावर कोरोनाची आपत्ती ओढावल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळत आहे. जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरु आहेत ते सांगण्याची संधी आज दिली. महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती.

देशात लॉकडाउन लागू केल्यामुळे त्याचा परिणाम देशभरात दिसल्याचे सांगत करोना संकटाचा परिणाम जेवढा बाहेरील देशांवर झाला तेवढा भारतावर झाला नसल्याचे पंतप्रधान या चर्चेदरम्यान म्हणालेय. मात्र, असे असले तरी ३ मे नंतर सतर्कतेच्या दृष्टीने प्रभावी धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे मोदी म्हणाले. या धोरणामुळे लोकांच्या रोजच्या जगणे सोपे व्हावे आणि साथीच्या आजाराला नियंत्रणात ठेवणेही शक्य व्हावे असे हे धोरण असेल असे मोदी म्हणाले. करोनाविरोधातील ही एक दीर्घकालीन लढाई असून आपल्याला मोठ्या धैर्याने याचा सामना कराला लागेल, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

“पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी . मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा.संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत,”असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

२७ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची सरकारची रणनीती आहे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याबरोबरच कोरोना तपासणीचा वेगही वाढविण्यात येणार आहे. देशातील या जिल्ह्यांत मे नंतर संक्रमितांची संख्या वाढण्यापासून रोखण्याची सरकारची योजना आहे. मेच्या पहिल्या आठवड्यानंतर देशातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्यास सुरूवात होईल, अशी सरकारची आशा आहे.

 

News English Summary: There is still suspense as to whether the country’s lockdown will end after 3 p.m. The decision on the nationwide lockdown will be taken after 3 minutes and a policy on de-lockdown will have to be finalized, Prime Minister Narendra Modi said during video conferencing with Chief Ministers of various states, sources said.

News English Title: Story Corona virus lockdown PM Narendra Modi Meeting With Cm To Discuss Situation News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या