22 November 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

कोरोनामुळे कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी सोनावणे यांचं निधन

Corona Crisis, Covid 19, Mumbai Police

मुंबई, २६ एप्रिल: कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर आणि संदीप सुर्वे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. मात्र, सरकार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

मुंबईत एका ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता. संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत ९६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ९६ पोलिसांत १५ अधिकाऱ्यांचा आणि ८१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ७ पोलिसांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली होती.

 

News English Summary: Shivaji Narayan Sonawane, a 56-year-old police constable of the Kurla Transport Department, has died while battling a coronavirus, according to the official Twitter handle of the Mumbai Police.

News English Title: Story One More Mumbai Police constable dead because of Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x