22 November 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

निर्णय चुकला, आपत्तीत चिनी रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट किट्स ऑर्डर रद्द करण्याची वेळ

Corona Crisis, Covid 19, PM Narendra Modi, MP Rahul Gandhi, ICMR

नवी दिल्ली, २७ एप्रिल: रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठयाची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. करोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूविरोधातील लढ्यातील ढाल म्हणून उपयुक्त ठरत असलेल्या कोविड टेस्टिंग किटमधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केलाय. इंडियन कौन्सिल ऑफ इंडिया (आयसीएमआर) ला महागड्या दराने टेस्टिंग किटची विक्री करण्यात आल्याचे समोर येत आहे. या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

चीनमधून आयात करण्यात येत असलेल्या कोविड १९ रॅपिड टेस्ट किटच्या माध्यमातील खरेदी-विक्रीतील वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर यासंदर्भातील दराचा खुलासा झाला आहे. देश संकटात असताना काहीजण फायदाचा विचार करत आहेत. ही गोष्ट लाजीरवाणी असून जी लोक संकटाच्या काळात फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

ICMR’ने या किट्सचा वापर करु नका, हे किट्स पुन्हा त्या कंपन्यांना परत करा असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. ‘Covid-19 चे निदान करण्यासाठी आरटी पीसीआर गळा/नाक स्वॅब चाचणीच सर्वोत्तम आहे. या चाचणीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्येच व्हायरस असेल तर समजतो’ असे आयसीएमआरने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

News English Summary: Order for supply of Rapid Antibody Test Kits to China has been canceled. The health ministry said on Monday. The kits were ordered from China so that the corona virus could be tested and diagnosed quickly. But due to the poor quality of the kits, it has been decided to cancel the order. All procedures were followed at the time of purchase. Therefore, the government has made it clear that not a single penny will be wasted.

News English Title: Story Shame and disgust MP Rahul Gandhi amid row over cost of Covid 19 test kits News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x