22 November 2024 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

शुभ वार्ता! पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे

Covid 19, Corona Crisis, Pune Division, Deepak Mhaisekar

पुणे, २७ एप्रिल: मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाघितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या ६०६ वरुन थेट १३१९ वर पोहोचली आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी १०० रुग्ण आढळून येत आहे.

तसेच पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ हजार ४५७ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण १ हजार १३९ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारवाई अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री.अनिल कवडे, श्री,सौरभ राव, श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि श्री.कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करणार आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकुण १५ हजार ८११ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १४ हजार ९३५ चा अहवाल प्राप्त झाला आहे. ८७७ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १३ हजार ४२८ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ४५७ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

 

News English Summary: Also, 230 corona infected patients in Pune division have recovered and gone home and the number of corona infected patients in the division has reached 1 thousand 457. There are 1,139 active patients. A total of 88 coronary heart disease patients have died in the department. Also, 48 patients are in critical condition and the rest are under observation. Presented by Deepak Mhaisekar.

News English Title: In Pune division 230 covid 19 patient recovered from corona virus says Deepak Mhaisekar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x