22 April 2025 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

अमेरिका चीनकडून नुकसान भरपाई घेण्याच्या तयारीत...ट्रम्प यांचं वक्तव्य

Covid 19, Corona Crisis, US President Donald Trump, China Wuhan City

वॉशिंग्टन, २८ एप्रिल: कोरोनाची जीवघेणी साथ जगभरात फैलावण्यास चीनच कारणीभूत आहे असा आरोप सातत्यानं करणाऱ्या अमेरिकेनं आता चीनकडून नुकसानीची भरपाई घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘आमच्या नुकसानीची चीनकडून आम्ही मजबूत वसुली करणार आहोत. मात्र, त्याचा अंतिम आकडा अद्याप ठरलेला नाही,’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

सध्या सुरू असलेल्या घडामोडींकडे जर्मनी प्रमाणेच आमचंही लक्ष आहे. आम्ही जर्मनीपेक्षा जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागण्याचा विचार करत आहोत, असं ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे युरोपियन देशांसह अमेरिकेचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. जगभरात ३० लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातले एकटे १० लाख अमेरिकेत आहेत. कोरोनामुळे दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी जीव गमावला असून त्यातले ५६ हजार मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.

तत्पूर्वी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पोम्पिओ यांनीदेखील चीनवर टीका करताना म्हटलं होतं की, “अमेरिकेला पूर्ण विश्वास आहे की बिजिंग करोनाच्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलं. त्यांनी योग्य वेळेत याची माहिती दिली नाही, ज्यामुळे जगभरात त्याचा फैलाव झाला आहे”. यानंतर चीनकडून परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी अमेरिकेच्या टीकेला उत्तर देताना, “उगाच राजकारण करु नका. ही सगळी ऊर्जा लोकांचा जीव वाचवण्यासाठी सांभाळून ठेवा,” असं म्हटलं होतं.

 

News English Summary: The United States, which has repeatedly accused China of being behind the spread of the Corona suicide bombings around the world, has now signaled that it will seek compensation from China. ‘We are going to recover our losses from China. However, the final figure has not been decided yet, ‘said US President Donald Trump.

News English Title: Story Corona virus Lockdown President of America Donald Trump Says Not Happy With China Investigation Going On covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या