25 November 2024 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

कोरोनावर प्लाझ्मा थेरपीच्या सफलतेचा कोणताही पुरावा नाही - आरोग्य मंत्रालय

ICMR, Corona Crisis, Covid 19, Plasma therapy treatment, Union Health Ministry

नवी दिल्ली, २८ एप्रिल: देशात गेल्या २४ तासात करोनाचे १५९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी दैनंदिन पत्रकार परिषदेत म्हटले की, कोरोना विषाणूच्या उपचारावरुन जगात आतापर्यंत कोणतीच थेरपी मंजूर नाही. इतकेच प्लाझ्मा थेरपीलाही अजून मंजुरी नाही. हे सध्या प्रायोगित तत्त्वावर सुरु आहे. यावरुन कोणतेही पुरावे आलेले नाहीत. याचा उपचाराचा भाग म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. अमेरिकेतही याचा प्रयोग म्हणूनच वापर केला जात आहे.

कोरोनावर उपचार करताना प्लाझ्मा थेरपीच्या सफलतेचा कोणताही पुरावा नसल्याचे महत्त्वपूर्ण विधान लव अग्रवाल यांनी केले आहे. सध्या प्लाझ्मा थेरपीबाबत प्रयोग सुरू आहेत, आणि आयसीएमआर याबाबतची अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने प्रयोग करत आहे, असे लव अग्रवाल पुढे म्हणाले. परवानगी नसेल तर कुणीही प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करू नये असेही ते म्हणाले. कारण तसे करणे हे रुग्णांसाठी धोकादायकही ठरू शकते आणि ते बेकायदेशीरही आहे, असेही अग्रवाल पुढे म्हणाले.

 

News English Summary: Health Ministry Joint Secretary Love Agarwal told a daily press conference on Tuesday that no therapy has yet been approved in the world for the treatment of corona virus. So much plasma therapy is not yet approved. It is currently underway on an experimental basis. No evidence has emerged from this. It can be used as part of treatment. It is also being used as an experiment in the United States.

News English Title: Story no evidence of Plasma therapy treatment no approval from ICMR says Union Health Ministry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x